Ind beat Sa 1st ODI : थरार शेवटच्या षटकापर्यंत! रांची वनडेत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय; विराटचे शतक, कुलदीपचा भेदक मारा

रांची : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला रोमांचक सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा हा विजय विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक आणि रोहित शर्मा व केएल राहुल यांच्या दमदार अर्धशतकांमुळे अधिक संस्मरणीय ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत आठ बाद ३४९ धावांचा डोंगर उभा केला. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जोरदार झुंज दिली, मात्र ते ४९.२ षटकांत ३३२ धावांतच गारद झाले. त्यांच्याकडून मॅथ्यू ब्रिट्झके (७२), मार्को जॅन्सन (७०) आणि कॉर्बिन बॉश (६७) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. भारतीय गोलंदाजांपैकी कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. त्याला हर्षित राणाने तीन बळी घेऊन चांगली साथ दिली. तर अर्शदीप सिंगने दोन आणि प्रसिद्ध कृष्णाने एक बळी घेतला. या विजयामुळे मालिकेत टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे.

रोहित-विराटची 'मॅचविनिंग' भागीदारी





पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाकडून चौथ्याच षटकात यशस्वी जैस्वाल केवळ १८ धावांवर बाद झाला. याच षटकात रोहित शर्माचा एक झेलही सुटला, जो दक्षिण आफ्रिकेला खूप महागात पडला. जैस्वाल बाद झाल्यानंतर रोहित शर्माला साथ देण्यासाठी आलेल्या विराट कोहली याने रोहितसोबत मिळून १३६ धावांची दमदार शतकी भागीदारी केली आणि दक्षिण आफ्रिकेवर मोठा दबाव आणला. या भागीदारीसोबतच, रोहित शर्माने फलंदाजी करताना आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडत वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. रोहित आणि विराटच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच भारताला ३४९ धावांचा डोंगर उभा करणे शक्य झाले.


विराट कोहलीचा रांचीत शतकी धमाका


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (ODI) टीम इंडियाने ३५० धावांचा विशाल डोंगर उभा केला. या धावसंख्येमध्ये विराट कोहलीची ऐतिहासिक शतकी खेळी आणि केएल राहुलच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकाचा मोठा वाटा आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडियाला लागोपाठ धक्के बसले. २२व्या षटकात ५१ चेंडूंत ५७ धावा (५ चौकार, ३ षटकार) करून बाद झाला. २७व्या षटकात केवळ ८ धावांवर माघारी परतला. ३१व्या षटकात १३ धावांवर बाद झाला. एका बाजूने विकेट्स पडत असताना विराट कोहली याने आपला अनुभव पणाला लावत जबरदस्त फलंदाजी केली आणि ३८व्या षटकात आपले दमदार शतक पूर्ण केले. १०२ चेंडूत शतक ठोकणाऱ्या कोहलीने अखेरीस ११ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १२० चेंडूत १३५ धावांची वादळी खेळी केली. त्याला नांद्रे बर्गरने बाद केले. कोहली बाद झाल्यानंतर केएल राहुलने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत ६० धावांची महत्त्वाची खेळी केली आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवले. ज्यामुळे भारताने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेसमोर ३५० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

३५० धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी


भारताने दिलेल्या ३५० धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाहुण्या फलंदाजांवर दबाव ठेवला. दक्षिण आफ्रिकेला डावाच्या दुसऱ्याच षटकात युवा गोलंदाज हर्षित राणाने दोन जबरदस्त धक्के दिले. त्याने आधी रयान रिकेल्टनला बाद केले. त्याच ओव्हरमध्ये त्याने धोकादायक फलंदाज क्विंटन डी कॉकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्या वेळी आफ्रिकेचा स्कोर केवळ ७ धावा होता आणि त्यांचे २ महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते. या धक्क्यानंतर पाचव्या षटकात कर्णधार मार्करमही अर्शदीप सिंगचा शिकार झाला. यानंतर जोर्जी आणि मॅथ्यू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत चांगली भागीदारी रचली. मात्र, १५व्या षटकात कुलदीप यादवने जोर्जीला बाद करून भारताला मोठा दिलासा दिला आणि ही भागीदारी तोडली. पुढे ब्रेविसने चांगली खेळी करत संघाला सावरले, पण २२व्या षटकात हर्षित राणा पुन्हा चमकला आणि त्याने ब्रेविसला ३७ धावांवर बाद केले. या लागोपाठच्या धक्क्यांमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत आला होता.

जान्सेन-ब्रिट्झकेची तुफानी ९७ धावांची भागीदारी व्यर्थ


भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या धक्क्यानंतर मॅथ्यू ब्रिट्झके आणि मार्को जान्सेन यांच्या जोरावर जोरदार पुनरागमन केले. या दोघांनी मिळून ९७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत टीम इंडियावर दबाव आणला. मार्को जान्सेन हा अधिक आक्रमक होता. त्याने केवळ २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत भारतीय गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. हा धोका लक्षात घेऊन गोलंदाजीवर आलेल्या कुलदीप यादवने मात्र सामन्याचे चित्र पालटले. ३३व्या षटकात त्याने जान्सेनला ३९ चेंडूत ७० धावांवर (८ चौकार, ३ षटकार) बाद करत ही भागीदारी मोडली. याच षटकात कुलदीपने ब्रिट्झकेलाही (७२ धावा) तंबूत धाडले. एकाच षटकात दोन सेट फलंदाज बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव पुन्हा अडचणीत आला. यानंतर, बर्गर आणि कॉर्बिन बॉश (६७) यांनी चांगली भागीदारी करत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. पण ४७व्या षटकात अर्शदीप सिंगने बर्गरला बाद केले आणि सामना पुन्हा भारताच्या बाजूने झुकवला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १८ धावांची आवश्यकता असताना, प्रसिद्ध कृष्णाने कॉर्बिन बॉशला बाद करून दक्षिण आफ्रिकेचा संघ ३३२ धावांवर गारद केला.
Comments
Add Comment

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील अमेरिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा ३२ धावांनी विजय

T20 World Cup 2026 NZ vs UAE: यूएईला धूळ चारत न्यूझीलंडचा एकतर्फी विजय

चेन्नई: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी

T20 World Cup 2026 NED vs NAM: नेदरलॅंड्सच्या विजयी खेळीचा पाकिस्तानला फटका

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

BCCI Central Contracty Players List: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून 'या' पाच मोठ्या खेळाडूंची नावे गायब

दिल्ली: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून दुर्लक्षित खेळाडू: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील हंगामासाठी

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या