IND VS SA : एस. बद्रीनाथने निवडली वनडे मालिकेची टीम.. रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश; पण रिषभ पंत?

रांची IND vs SA : रांची येथे उद्यापासून भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेतील पराभवानंतर आता एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. या मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीही बराच काळानंतर भारतीय जर्सीत देशांतर्गत मैदानावर उतरणार आहेत. पहिल्या सामन्यात कोणाला संधी द्यायची याबाबत चर्चा रंगत असताना, भारताचा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथनं १५ पैकी ११ खेळाडूंची स्वतःची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.


बद्रीनाथच्या संघ निवडीतील मुख्य मुद्दे
बद्रीनाथनं निवडलेल्या संघात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग या तिघांना त्यानं गती विभागात स्थान दिलं आहे. मुख्य फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवची निवड त्यानं कायम ठेवली. तर ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली आहे.


त्याच्या निवडीतला सर्वात मोठा बदल म्हणजे विकेटकीपर रिषभ पंतला बाहेर ठेवण्यात आलं आहे. केएल राहुल स्वतः विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळू शकतो, या कारणामुळे पंतला स्थान मिळालं नाही, असं बद्रीनाथचं मत आहे. रोहित शर्मा ओपनर असतानाच शुभमन गिलऐवजी यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरऐवजी ऋतुराज गायकवाडला जागा देण्यात आली आहे.


बद्रीनाथची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, केएल राहुल (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग


अधिकृत भारतीय संघ
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार), रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल


दक्षिण आफ्रिकेचा अधिकृत संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, रुबिन हर्मन, केशव महाराज, मार्को जॅनसेन, एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, रायन सुबरेन, प्रिलेटन


वनडे मालिकेचं वेळापत्रक
पहिली वनडे – ३० नोव्हेंबर – रांची
दुसरी वनडे – ३ डिसेंबर – रायपूर
तिसरी वनडे – ६ डिसेंबर – विशाखापट्टणम

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या