अपात्र गिरणी कामगारांनाही म्हाडाची घरे मिळणार!

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत


मुंबई : कागदपत्रांमधील त्रुटीमुळे म्हाडाचे घर मिळविण्यासाठी अपात्र ठरलेल्या गिरणी कामगारांना व त्यांच्या वारसांना आता आपल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ३१ डिसेंबरपर्यंत म्हाडाकडे करता येणार आहे. कामगार आयुक्तांनी त्याबाबत म्हाडाला निर्देश दिले असून त्याचा थेट फायदा सात हजारांहून अधिक कामगारांना होऊ शकणार आहे.


गिरणी कामगारांना अल्प किमतीत हक्काचे घर देण्याची योजना राज्य सरकारने २००० मध्ये जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरातील ५८ बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीत यशस्वी न झालेल्या सुमारे दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’ने अभियान सुरू केले होते. त्यानुसार १ लाख आठ हजार ५५० अर्जदारांनी अर्ज केले असून त्यातील ९९ हजार ९३७ अर्जदार पात्र ठरले आहेत.


कागदपत्रांमधील त्रुटींमुळे सात हजार कामगार अपात्र ठरले आहेत. या कामगारांना आवश्यक कागदपत्रे जोडून देण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून कामगार आयुक्तांकडे गिरणी कामगार संघटनांनी केली होती. वेळेत कागदपत्रे न मिळाल्याने सादर करण्यास विलंब झाला होता, त्यांना आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने दिलासा मिळणार आहे.


गिरणी कामगारांना एसएमएसद्वारे माहिती


म्हाडाने दिलेल्या मुदतीत ज्या गिरणी कामगारांना दिलेल्या कालावधीत कागदपत्रे अपलोड करता आली नाहीत, अशा गिरणी कामगार, वारसांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत विशेष संधी द्यावी व त्या अानुषंगाने पोर्टलमध्ये बदल करावेत, असे आदेश कामगार उप आयुक्तांनी म्हाडाला दिले आहेत. या मुदतवाढीची माहिती संबंधित गिरणी कामगार आणि वारसांना एसएमएसद्वारे द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

भाजपची मुंबईतील बूटपॉलिशवाल्यांनाही साद

महापालिका निवडणूक प्रचाराचे अभिनव ‘फंडे’ मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकाच नव्हे, तर

कांदिवली पूर्व विधानसभा पुढेही उबाठा आणि काँग्रेसमुक्त दिसणार?

िचत्र पालिकेचे कांदिवली िवधानसभा सचिन धानजी मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात नगरसेवक पदाचे आठ

मुंबई महापालिका रुग्णालयांत आता ‘सूक्ष्मजंतुनाशक’ बेड मॅट

जंतुसंसर्ग रोखण्यासाठी पालिका सज्ज मुंबई : मुंबईतील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारा

इच्छुक उमेदवारांची कागदपत्रे जमवण्यासाठी धावपळ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता मंगळवारी (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार

वांद्रे पूर्व स्कायवॉकचा खर्च १७ कोटींनी वाढला

जलवाहिनी आणि पर्जन्य जलवाहिनींमुळे खर्चात वाढ एका सरकत्या जिन्याचे बांधकाम केले रद्द मुंबई : वांद्रे पूर्व

कांदिवली-बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामानिमित्त पश्चिम रेल्वेचा १८ जानेवारीपर्यंत ब्लॉक

मोठ्या प्रमाणावर लोकल रद्द होणार बेस्टला ज्यादा बस सोडण्याची रेल्वेची विनंती मुंबई : सहाव्या मार्गिकेचे काम