महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष अनारक्षित गाड्या

मुंबई : मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांसाठी ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत १५ विशेष अनारक्षित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील नागपूर, नाशिक, वर्धा या विविध जिल्ह्यातून रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे १५ विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. अनुयायांसाठी सलग तीन दिवस रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.


४ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२६० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६२, नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. ५ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.


६ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२५१- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.०० वाजता पोहोचेल. ८ रोजी सुटणारी गाडी क्रमांक ०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी गाडी क्रमांक ०१२५३ दादर – नागपूर विशेष गाडी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन