२४ तासांत बलुचिस्तानला ७ स्फोटांचा तडाखा; रेल्वे ट्रॅक, पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला

बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अवघ्या २४ तासांत सात स्फोटकांच्या घटनेने प्रदेश हादरून गेला आहे. एकीकडे रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला, तर दुसरीकडे पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.


पहिली घटना तुर्बतच्या निवजाद क्षेत्रात घडली. अज्ञात दहशतवाद्यांनी रेल्वे ट्रॅकवर बॉम्ब ठेवून मोठा स्फोट घडवला. या स्फोटात ट्रॅकचे मोठे नुकसान झाले असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले.


दुसरी मोठी घटना रात्री उशीरा पंजगुर जिल्ह्यात घडली. येथील पोलिस ठाण्यावर अज्ञात व्यक्तींनी ग्रेनेड फेकून हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पोलिसांनी तातडीने परिसर सील करून सर्च ऑपरेशन सुरू केले.


या दोन मोठ्या घटनांव्यतिरिक्त इतर भागात पाच लहान-मोठे स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. सलग हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांचे सावट गडद झाले आहे. सुरक्षा दलांनी प्रांतात उच्च सतर्कता जारी केली असून अतिरिक्त फोर्स तैनात करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. बलुचिस्तानमधील या घटनांनी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Comments
Add Comment

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना

पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस बॉम्बस्फोट करुन उडवण्याचा प्रयत्न, बलुचिस्तानमध्ये रेल्वे ट्रॅकचे नुकसान

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधून एक धक्कादायक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जाफर एक्सप्रेस या

बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या! १० आरोपींना अटक, युनुस सरकार काय निर्णय घेणार ?

ढाका: बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या घटनेनंतर, आतापर्यंत दहा

बांगलादेशातील हिंदूच्या हत्येप्रकरणी ७ जणांना अटक

ढाका : बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाकडून

चीनकडून बांगलादेशात लष्करी आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ

नवी दिल्ली  : भारताला घेरण्यासाठी चीनने पाकिस्ताननंतर आपले लक्ष आता बांगलादेशवर केंद्रित केले आहे.