Cyclone Ditwah : दक्षिण भारतासाठी रेड अलर्ट! श्रीलंकेत हाहाकार माजवल्यानंतर 'डिटवा' चक्रीवादळ दक्षिण भारताकडे; वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस सुरू

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत असून, श्रीलंकेत (Shrilanka) धुमाकूळ घातल्यानंतर 'डिटवाह' चक्रीवादळ (Cyclone Ditwah) आता भारताच्या दक्षिण किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे. या वादळामुळे संपूर्ण दक्षिण भारतात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज, रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांवर पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळ सध्या उत्तर-वायव्येकडे सरकत असून, रविवारी पहाटे नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्यापूर्वी उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यांना ओलांडेल. या वादळाने शेजारच्या श्रीलंकेत मोठा विध्वंस घडवला आहे, जिथे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून तितकेच लोक बेपत्ता आहेत. श्रीलंकेतील परिस्थिती पाहता, भारत सरकारने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरी या सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या राज्यांमध्ये अत्यंत दक्षता बाळगली आहे. तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि मदत कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.



चेन्नई विमानतळावरील ३५ हून अधिक उड्डाणे रद्द; गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम


'डिटवाह' चक्रीवादळामुळे (Cyclone Ditwah) तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम जाणवत असून, त्यामुळे हवाई आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. चक्रीवादळाच्या तीव्र प्रभावामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chennai Airport) ३५ हून अधिक उड्डाणे (Flights) रद्द करण्यात आली आहेत. तसेच, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रक देखील प्रभावित झाले आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तामिळनाडूतील रामनाथपुरम आणि नागपट्टिनम हे जिल्हे चक्रीवादळामुळे सर्वात जास्त प्रभावित झाल्याचे वृत्त आहे. या भागांत प्रशासन युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी (दि. २९) चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत कमीत कमी व्यत्यय आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.



तामिळनाडूच्या ४ जिल्ह्यांत 'रेड', तर ५ जिल्ह्यांत 'ऑरेंज' अलर्ट जारी


'डिटवाह' चक्रीवादळामुळे (Cyclone Ditwah) तामिळनाडूच्या किनारपट्टीवर गंभीर धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या चार जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' (Red Alert) आणि पाच जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की, 'डिटवाह' चक्रीवादळ किनाऱ्याजवळून जाईल. आज (रविवार) सकाळी ते किनारपट्टीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असेल आणि रविवारी संध्याकाळपर्यंत ते केवळ २५ किलोमीटर अंतरावर किनारपट्टी ओलांडेल. या वादळाबाबत हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, "आज, ३० नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत ते उत्तर-वायव्येकडे सरकण्याची आणि उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे." वादळाच्या प्रभावामुळे किनारी भागांमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१