मेट्रो-९ चा दहिसर ते काशीगाव पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होणार

मुंबई : दहिसर-भाईंदर या मेट्रो-९ या मार्गिकेच्या कामाला आता गती आली आहे. या मेट्रो-९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव पहिला टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. यानुसार नुकतेच आयएसए म्हणजेच स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आता सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्यादृष्टीने लवकरच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा पथकाला पाचरण करण्यात येणार आहे. या पथकाकडून सुरक्षा चाचण्या झाल्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि त्यानंतर दहिसर ते काशीगाव मार्गिकेच्या संचलनाचा मार्ग मोकळा होईल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मीरा-भाईंदरवासीयांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.


दहिसर-मीरारोड अंतर कमी करून परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून १३.५ किमी लांबीच्या मेट्रो ९ चे काम सुरु करण्यात आले आहे. ही मार्गिका दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरे थेट मीरा-भाईंदर शहराशी जोडली जाणार आहेत. या मार्गिकेत १० स्थानकांचा समावेश असून मार्गिकेच्या बांधकामासाठी ६६०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिला टप्पा दहिसर ते काशीगाव असा ४.५ किमीचा आहे. या टप्प्याचे बांधकाम काम पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वीच या मार्गिकेवरील गाड्यांसह विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली.


आता दहिसर ते काशीगाव टप्प्याला आयएसए अर्थात स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता लवकरच आरडीएसओ प्रमाणपत्र प्राप्त होईल. दुसरीकडे दहिसर ते काशीगाव टप्प्याचे संचलन करण्यासाठीच्या शेवटच्या प्रक्रियेला अर्थात सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा