‘द फोल्क आख्यान’च्या संगीतकाराचे पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला संगीत !

शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी...' अशी एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली आहे.


सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असलेल्या आणि लोककलेला मानाचा मुजरा देणाऱ्या आणि संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोल्क आख्यान’ या प्रभावी टीमकडे या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ठसकेबाज सादरीकरणाने आणि लोककलेला मांडण्याच्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्यांनी खास पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोल्क आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत. त्यामुळे आता ‘द फोल्क आख्यान’ची संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथा सांगण्याच्या ताकदीचा संगम पाहाण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. येत्या नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे.

Comments
Add Comment

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल