शिक्षिकेची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल

जौनपूर : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे किती पवित्र आणि अनोखं असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. शाळेच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवून विद्यार्थी आपल्या ज्ञानात भर टाकतात. शिक्षकांनी जे काही शिकवतात, त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात बदल घडवतात. पालक त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी काबाडकष्ट करतात आणि चांगल्या शाळेत त्यांचं ्डमिशन करतात. पण काही शाळांमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. काही शिक्षक निरागस विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करतात, अशाप्रकारच्या अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्या आहेत. असाच एका शिक्षिकेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


त्या शाळेत नेमकं काय घडलं?


जौनपूर बदलापूर पोलीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत भलुआही येथे एक शाळा आहे. या शाळेत लहान मुलं-मुली वर्गात बसलेले असतात. त्याचदरम्यान एक शिक्षिका या निरागस विद्यार्थ्यांच्या कानशि‍लात लगावते आणि नंतर त्यांना छडीनेही मारते. शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने मारहाण केल्याचं कॅमेरात कैद झाल असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्हिडीओ पाहून यूजर्सने महिला शिक्षिकेवर जोरदार टीका केली आहे.





एका यूजरने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, मॅडमचा पारा चढला, मुलांना जोरदार मारहाण..जौनपूरच्या बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भलुआहीं येथील पब्लिक स्कूलमध्ये लहान-लहान मुलांना मारहाण करताना मॅडम म्हणत होती, “सगळी जबाबदारी माझीच आहे का!” व्हिडिओ पाहून वाटतंय,घरचा राग मुलांवर काढत आहे का?

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

जहाज आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज; कोचीत राहणार तैनात पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय