राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू

अकोट : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना सोमवार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्देशामुळे राज्यात ठिकठिकाणी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या अशा वातावरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक धक्कादायक आणि दुःखद बातमी कळली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. अलमास परवीनशेख सलीम असे या महिला उमेदवाराचे नाव होते.


अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अलमास परवीनशेख सलीम निवडणूक लढवत होत्या. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज भरलेल्या पात्र उमेदवाराचा निवडणुकीआधी मृत्यू झाल्यास संबंधित मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली जाते. यानंतर मृत व्यक्ती ऐवजी इतर कोणी निवडणूक लढवू इच्छीत असल्यास त्यांना एक संधी दिली जाते. एखाद्या पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर संबंधित पक्षाला नवा उमेदवार देण्याची संधी दिली जाते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवा उमेदवार देण्याची संधी मिळणार आहे.


निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार उमेदवारांना १ डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. अपक्षांना बुधवारी चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर, निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेतही बदल केला असून २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना आणि उमेदवारांना दिले आहेत.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा