मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालयात खळबळ; गेस्ट स्पीकरवर विद्यार्थिनींचे गैरवर्तनाचे आरोप

मुंबई : दक्षिण मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्स महाविद्यालयात एका गेस्ट स्पीकरने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला असून संपूर्ण महाविद्यालयात यामुळे मोठी खळबळ माजली आहे. हिंदी विभागाच्या ‘अंतास’ या वार्षिक महोत्सवासाठी बोलावलेल्या वक्त्यावर पहिल्या वर्षातील विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात दहा विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या इंटर्नल कंप्लेंट्स कमिटी (ICC) कडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांत एफआयआर नोंदवण्याची मागणीही केली आहे.


Times of india ने दिलेल्या माहितीनुसार घटना दोन दिवसांपूर्वीची असून महाविद्यालयाने या वक्त्याला फेस्टदरम्यान कॅम्पसमध्येच राहण्याची व्यवस्था केली होती. विद्यार्थिनींच्या मते, वक्त्याने त्यांच्या नकळत फोटो काढले तसेच चुकीचा स्पर्श केला. हा सर्व प्रकार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच घडल्याचे विद्यार्थिनींनी स्पष्ट केले.


तक्रार मिळताच महाविद्यालय प्रशासनाने त्वरित कारवाई करत त्या दिवशीच वक्त्याला कॅम्पस सोडण्यास सांगितले. मात्र अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. विद्यार्थिनींच्या मागणीनंतर प्राध्यापकांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून एफआयआरसाठी पुढील पाऊले उचलली जातील. आझाद मैदान पोलिसांनी सध्या याप्रकरणी कोणतीही नोंद झालेली नसल्याचे सांगितले आहे.


प्राचार्या करुणा गोकर्ण यांनी सांगितले की, महाविद्यालय लैंगिक छळाच्या कोणत्याही प्रकाराबाबत शून्य-सहनशीलतेची भूमिका घेत असून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की घटना सोमवारी घडताच त्या वक्त्याला महाविद्यालयातून बाहेर काढले. तसेच या घटनेची माहिती त्याच्या विद्यापीठालाही देण्यात आली आहे.


गोकर्ण यांनी सांगितले की विद्यार्थिनींनी शुक्रवारी ICC कडे लेखी तक्रार दिली आहे आणि आता सविस्तर चौकशी सुरू होईल. चौकशी अहवाल संबंधित विद्यापीठालाही पाठवला जाईल. पोलिस तपासासाठी महाविद्यालय पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर महाविद्यालयाने आगामी कार्यक्रमांसाठी अतिथी वक्त्यांची पार्श्वभूमी तपासणी अधिक काटेकोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक

देशभरात वीज होणार स्वस्त

पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा निर्णय जानेवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने

दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना

नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

भारतातील पहिलाच प्रयोग नागपूर : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल