येत्या तीन वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही


मुंबई : येत्या ३ वर्षांमध्ये बदलापूरमधून मेट्रो धावेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विकासाची ब्लू प्रिंट सांगितली. ते म्हणाले पुढील पाच वर्षांमध्ये बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल. मेट्रो-१४ च्या कामासाठी १८ हजार कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. मेट्रो पाचही बदलापूरपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी फडणवीस यांनी बदलापूरकरांना दिला.


बदलापूर - कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. मुंबई लोकल ट्रेनला मेट्रो सारखे कोच लावणार आहोत. मेट्रोसारखे दरवाजे आणि एसी लोकल असेल. त्यात कोणतीही दरवाढ करणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. कांजूरमार्ग- बदलापूर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो ठाण्यातील इतर मेट्रो मार्गाला जोडण्याचा प्लॅन सरकारने केला आहे. ४५ किमीचा मार्ग पुढील ४ वर्षांत मार्गी लागेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कांजूरमार्ग, विक्रोळी, एलबीएस मार्ग, चिकोली, शीळ फाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर या स्थानकांचा या मार्गावर समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. कांजूरमार्ग ते घणसोलीपर्यंत भूमिगत, नंतर बदलापूरपर्यंत उन्नत असा मार्ग असेल, असेही सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाला १८ हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.


बदलापूर - कांजूरमार्ग या मार्गावर मेट्रो झाल्यास लोकल मार्गावरील गर्दीवर नियंत्रण येणार आहे. सर्वसामान्यांना गारेगार प्रवास करता येईल. त्याशिवाय मुंबई आणि बदलापूर या दोन शहरातील अंतर अतिशय कमी होईल. कमी खर्चात आलिशान प्रवासाची सोय होणार आहे. बदलापूरहून दररोज हजारो लोक मुंबईमध्ये कामासाठी येतात, त्यांना लोकलच्या गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यात मर्यादित लोकल असल्याने वेळेचे गणितही कोलमडले. पण मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर बदलापूरकरांचा प्रवास आरामदायी तर होणार आहेच. त्याशिवाय गर्दीतून सुटका होणार आहे.

Comments
Add Comment

BJP News : भाजपचा उबाठासह शरद पवारांना पुन्हा दणका! माजी आमदार सुरेश भोईर, संजोग वाघेरेंच्या हाती कमळ

शरद पवारांच्या आमदराचा मुलगा भाजपमध्ये दाखल मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच,

मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार, आरोपीला ६ तासांत अटक

मालाड : मुंबईत अल्पवयीन मुलीवर गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

राज्यातील २४ नगर परिषदांमध्ये आज मतदान

उद्या मतमोजणी मुंबई : राज्यातील १६ जिल्ह्यांमधील २४ नगर परिषदांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या

Nagpur News : नागपूर हादरले! बुटीबोरी एमआयडीसीत भीषण दुर्घटना, ६ कामगारांचा मृत्यू

मृतांच्या वारसांना ३५ लाखांची मदत जाहीर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी

रचना संसद महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव; ‘आउट ऑफ द बॉक्स’ कला कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : रचना संसद कॉलेज यांचे रौप्य महोत्सव वर्ष म्हणजेच 25 वर्ष पूर्ण झाली. महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या