Chhattisgarh News : हृदय हेलावणारी घटना! ५ लाखांची खंडणी अन् बांधलेल्या अवस्थेतील फोटो; शिक्षिकेच्या अपहरणाने खळबळ

छत्तीसगड : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग येथील भिलाई शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. येथील एका शिक्षिकेचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले असून, अपहरणकर्त्यांनी तिच्या सुटकेसाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. ही शिक्षिका नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी घराबाहेर पडल्या आणि रिक्षाने शाळेकडे जात होत्या. याचदरम्यान, अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केले. ही घटना घडल्यानंतर काही तासांतच अपहरणकर्त्यांनी तिच्या पतीला फोन करून त्यांना धमकी दिली. या खंडणीखोरांनी पतीला केवळ फोनच केला नाही, तर आपली पत्नी बांधलेल्या अवस्थेत असल्याचा फोटोही पाठवला. पत्नीचा हा फोटो आणि खंडणीची मागणी ऐकून पती आणि कुटुंबीय प्रचंड घाबरले. त्यांनी वेळ न गमावता तत्काळ भिलाई कॅन्टोन्मेंट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी आणि शिक्षिकेची सुखरूप सुटका करण्यासाठी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.



फोन करून मागितली ५ लाखांची खंडणी


कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला नेहमीप्रमाणे भिलाई सेक्टरमधील तिच्या खासगी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. मात्र, ती शाळेत न पोहोचल्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने तिच्या पतीला फोन केला. पत्नी शाळेत पोहोचली नसल्याचे कळताच पतीला संशय आला आणि त्यांनी लगेच तपास सुरू केला. पती तपास करत असतानाच त्यांना एक अज्ञात कॉल आला. फोनवर असलेल्या अपहरणकर्त्याने स्पष्टपणे सांगितले की, "आम्ही तुमच्या पत्नीचं अपहरण केलं आहे. ५ लाख रुपये घेऊन या, नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील." या क्रूर अपहरणकर्त्यांनी केवळ धमकी दिली नाही, तर पुरावा म्हणून महिलेचा बांधलेल्या अवस्थेतील फोटो देखील पाठवला. यामुळे घाबरलेल्या पतीने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास वेगाने सुरू केला आहे.



केवळ खंडणीसाठी की अन्य कारण?


या घटनेची तक्रार मिळताच, दुर्ग पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. एसीसीयू टीम आणि कॅन्टोन्मेंट पोलीस स्टेशनच्या पथकांनी तांत्रिक आणि मानवी संसाधनांच्या आधारे संयुक्त तपास सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी एका संशयित रिक्षा चालकाला शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले. संशयित रिक्षा चालकाची कसून चौकशी केल्यानंतर, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अपहरण झालेल्या शिक्षिकेला सुरक्षितपणे शोधून काढले. महिलेला सुखरूप पाहून तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुरुवातीच्या तपासात या रिक्षा चालकानेच खंडणीसाठी शिक्षिकेचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही घटना केवळ पैशांसाठी घडली होती की यामागे काही इतर गंभीर हेतू होता, याचा तपास पोलीस आता करत आहेत. पोलीस सध्या आरोपी रिक्षा चालकासह महिलेचीही कसून चौकशी करत आहेत. या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवं वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी मुक्त

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील