सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक आणि दूषित पाण्यामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे ही नदी प्रदूषित झाल्याने शेतकऱ्यांसह मच्छिमारांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होत आहे.


एमआयडीसी परिसरातील अनेक रासायनिक कारखान्यांकडून उपचार न केलेले दूषित पाणी थेट नदी पात्रात सोडले जाते. या रसायनांमुळे नदीचे पाणी काळवंडण्याबरोबरच नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यातच भरती-ओहोटीच्या काळात हेच पाणी भातशेतीत येऊन परिणामी पिके सुकतात व शेतीचे उत्पादन घटते. नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीतील माशांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत झपाट्याने कमी झाले आहे. “पूर्वी आमच्या जाळ्यात दिवसाला बरेचसे मासे यायचे, आता मात्र नदीत जीवच उरलेला नाही. उरलेले मासेही विषारी झाल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी `दैनिक प्रहार’शी बोलताना दिली.


दुसरीकडे हवेत सोडल्या जाणाऱ्या रसायनी गॅसमुळे परिसरात श्वसनाचे, दम्याचे, डोळ्यांच्या जळजळीचे आजार वाढले आहेत. मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या प्रदूषणाचा फटका बसत आहे. धाटाव एमआयडीसीकडून रोजगार, ठेके किंवा इतर कोणत्याही स्वरूपात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही, मात्र त्याच एमआयडीसीच्या दूषित पाण्याचा फटका मात्र या भागातील लोकांना सहन करावा लागतो आहे. दरम्यान कोळी समाजाचे काही नेत्यांसह लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नावर मौन बाळगत असल्याची चर्चा रोह्यात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करून दोषी कारखान्यांवर कडक कारवाई करावी, तसेच नदी शुद्धीकरणासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या

Dhurandar 2 : बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आता 'या' OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार धुरंधर २

मुंबई : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला असून सिनेमा रिलीज होऊन २१ दिवस उलटले असतानाही

Matka King : दमदार स्टारकास्ट असणाऱ्या नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी सिनेविश्वात सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या सिनेमांमधून मातीतल्या वास्तववादी कथा

Shantecha Karte Chalu Aahe : लक्ष्मीकांत बेर्डेंचं अजरामर विनोदी नाटक, पुन्हा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज

मुंबई : रंगभूमीवर काही नाटकं प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहातात. यांपैकीच'शांतेचं कार्टं चालू आहे' हे एक

Gayatri Datar : लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ( Gayatri Datar) सध्या तिच्या वैयक्तिक

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास