रेल्वेतील चहा-नाश्त्यावर आयआरसीटीसीची नजर

मुंबई  : रेल्वे प्रवासात चहा, नाश्ता किंवा पाणी विकत घेताना छापील दरापेक्षा जादा पैसे आकारले जात असल्याच्या अनेक प्रवाशांच्या तक्रारी असतात. त्यावर उपाय म्हणून आयआरसीटीसी रेल्वे डब्यातील सर्व कर्मचाऱ्यांना एकसमान गणवेश, हेल्पलाइन क्रमांक आणि क्यूआर कोड असलेले ओळखपत्र अनिवार्य करणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करून प्रवासी पदार्थांचे निश्चित दर तपासू शकतील आणि थेट ऑनलाइन पेमेंटही करू शकतील.


रेल्वेच्या पश्चिम विभागात प्रवाशांच्या दररोज सरासरी १०० ते १२० तक्रारी येतात. त्यापैकी जवळपास निम्म्या तक्रारी जादा रक्कम आकारण्याबाबत असतात. सुट्टीचा हंगाम आणि पर्यटनाचा काळ लक्षात घेऊन तक्रारी कमी करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.


त्यानुसार प्रीमियम गाड्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गडद निळ्या रंगाचे जॅकेट, तर इतर सर्व गाड्यांतील कर्मचाऱ्यांसाठी फिकट निळ्या रंगाचे टी-शर्ट देण्यात येणार आहेत. या गणवेशावर आयआरसीटीसीचा हेल्पलाइन क्रमांक स्पष्टपणे नमूद असेल आणि क्यूआर कोड असलेले ओळखपत्रही सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. डब्यात सेवा देताना गणवेश परिधान करणे आणि ओळखपत्र लावणे सक्तीचे असेल.


मेनू, पदार्थांचे छापील दर दिसणार


क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रवाशांना मेनू, पदार्थांचे छापील दर तसेच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून जादा रक्कम मागण्याची शक्यता कमी होणार आहे. तसेच तक्रार नोंदवताना प्रवाशांकडे अधिक पुरावा उपलब्ध राहणार आहे.


समाज माध्यमांवरील तक्रारी आघाडीवर


फोन, ई-मेल, तक्रारपुस्तिका आणि समाजमाध्यमे या सर्व माध्यमांतून तक्रारी येतात. यापैकी समाजमाध्यमांवर सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या जातात; मात्र अनेक तक्रारी अपुऱ्या माहितीसह असल्याने निवारणात अडचणी येतात. काही वेळा खोट्या तक्रारीही येतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन गणवेश आणि डिजिटल पडताळणी प्रणाली लागू झाल्यावर प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास आयआरसीटीसीने दिला आहे.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील