मालाड रामबागमधील अनेक वर्षांपासूनचा अंधार झाला दूर

रस्त्याच्या विकासासह पिण्याचे पाणी, तुंबणाऱ्या पाण्याचीही मिटली समस्या


स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या प्रयत्नाला अखेर आले यश


मुंबई, (विशेष प्रतिनिधी) - मालाड पश्चिम येथील मागील आठ ते दहा वर्षांपासून सेवा सुविधांपासून वंचित असलेल्या राम बागमधील रहिवाशांना अखेर प्रकाश मार्ग सापडला. तब्बत १५ ते २० निवासी इमारती तसेच इंडस्ट्री इस्टेट असलेल्या या राम बागमधील रस्त्याची मागील अनेक वर्षांपासून दुरवस्था होती, आज या मार्गावरील रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची, पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची तसेच रस्त्यांवरील दिव्यांचीही समस्या कायमची सुटली. या मार्गावरील प्रकाश दिव्यांचे स्थानिक भाजपा नगरसेविका योगिता कोळी यांच्या हस्ते लोकार्पण करत हा रस्ता प्रकाशमान करण्यात आला. त्यामुळे एकप्रकारे येथील रहिवाशांना खऱ्या अर्थाने प्रकाश मार्ग सापडला.


मालाड पश्चिम येथील एस व्ही रोड पेट्रोलपंप जवळील राम बाग रोडवर तब्बल १५ ते २० इमारतींमध्ये ८०० निवासी वस्ती आहे. तसेच इतर हॉल आणि कमर्शियल कार्यालये आहेत.त्यामुळे यावरून दिवसाला ३ हजार लोकांची ये जा होत असते. हा मार्ग कच्चा असल्याने यावर विजेचे खांब, पावसाळी पाणी वाहून नेण्याची सुविधा नव्हती. त्यामुळे याबाबत रामबाग मार्गावरील इमारतींच्या सोसायट्यांनी स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्याकडे याठिकाणी रस्त्याचा विकास करून संलग्न सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार योगिता कोळी यांनी महापालिकेशी पाठपुरावा करून याठिकाणी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना जुनी जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिनी बसवून दिली, तसेच नव्याने पर्जन्य जलवाहिनी टाकली आणि रस्त्याचा विकास झाल्यानंतर विजेचे खांबही बसवले. त्यात विद्युत पुरवठा करण्यात आल्यानंतर या पथ दिव्यांचे लोकार्पण नगरसेविका योगिता कोळी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया असा एकच जयघोष करत रहिवाशांनी आनंद व्यक्त केला.


याबाबत रामबागमधील रहिवाशी गोपाळकृष्ण बैरोलिया यांनी बोलतांना असे सांगितले की, ही समस्या मागील १० ते १५ वर्षांपूर्वीपासूनची आहे. मी स्वत: याठिकाणी सहा वर्षांपूर्वी राहायला आलो, पण हा परिसर मला मागील ४५ वर्षांपासून ज्ञात आहे. त्यामुळे कमी दाबाने तसेच दुषित होणारा पाणी पुरवठा, पावसाळ्यात या मार्गावर साचणारे पाणी, पथदिवे नसल्याने अंधारातून जावे लागत असल्याने मागील चार वर्षांपासून योगिता कोळी आणि सुनील कोळी यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. आता रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले, तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटली, चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा होत आहे आणि रस्त्यावर दिवेही सुरु झाल्याने खऱ्या अर्थाने आम्ही योगिता आणि सुनील कोळी यांचे आभार मानतो,असे त्यांनी सांगितले. यासाठी दोघांनीही प्रचंड मेहनत घेतली, म्हणून येथील रहिवाशांना या सुविधा आज मिळाल्या आहेत.


..................


आज राम बाग रस्त्यावरील रहिवाशांचा समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला, यातील तांत्रिक अडचणींचे निवारण केल्यानंतर आज येथील रहिवाशांना सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता आणि जुनी जलवाहिनी बदलून नवीन,तसेच पर्जन्य जलवाहिनी टाकून दिल्यामुळे येथील रहिवाशांची मोठी समस्या दूर झाली आहे. विजेचे खांब बसले होते, त्यातून विद्युत पुरवठा करून दिल्यामुळे येथील मार्गही आता कायम प्रकाशमान झाला आहे. हे काम पूर्ण झाल्याचे समाधान तर आहेतच, पण रहिवाशांच्या चेहऱ्यांवरील आनंद हीच कामाची पोचपावती आहे. - योगिता सुनील कोळी, स्थानिक नगरसेविका

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई