मेट्रो-३ च्या प्रवाशांसाठी सवलतीच्या मासिक पासची सुरुवात

मुंबई : कफ परेड- वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो-३ मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्यांना आता सवलतीच्या मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)द्वारे आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून मेट्रो-३ च्या मेट्रोकनेक्ट३ मोबाईल ॲपवर सवलतीचे मासिक पास उपलब्ध करण्यात आले आहेत. मोबाईल ॲपद्वारे पास सुविधा देणारी मेट्रो-३ ही देशातील पहिली मेट्रो ठरली आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.


आजपासून मेट्रो मार्ग ३ वर प्रवास करणारे प्रवाशी दोन प्रकारे सवलतींसह ट्रिप-आधारित पास खरेदी करू शकतात. यामध्ये पहिली ६०-ट्रिप पासवर १५ टक्के सवलत आणि दुसरी ४५-ट्रिप पासवर १० टक्के सवलत अशा सवलतींसह प्रवास करता येणार आहे. हे पास प्रवास अधिक किफायतशीर करण्यासाठी तसेच तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक सोपी, डिजिटल आणि संपर्कविरहित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत. मेट्रो कनेक्ट ३ ॲपवर सोप्या पद्धतीने प्रवाशी पास खरेदी करून थेट मोबाइलद्वारे पास वापरू शकतात. मेट्रो कनेक्ट ३ ॲप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक