थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे १४५ मृत्यू

१२ प्रांतातील ३६ लाख नागरिकांना फटका


नवी दिल्ली  :थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. द मृतांचा आकडा १४५ वर पोहोचला आहे. पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, पुराचे पाणी कमी होत असताना, विनाशाचे भयानक दृश्ये समोर येत आहेत. थायलंडच्याक्षिण थायलंडमध्ये आपत्ती निवारण व व्यवस्थापन विभागाने सांगितले की, मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील  १२ प्रांतांमध्ये पूर आला आहे, ज्यामुळे १२ लाखांहून अधिक कुटुंबे व ३६ लाख लोक प्रभावित झाले आहेत.


बँकॉकमध्ये पत्रकार परिषदेत सरकारी प्रवक्ते सिरिपोंग अंगकासाकुल्कियात म्हणाले की, पुरामुळे आठ प्रांतांमध्ये १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. सोंगखला प्रांताला सर्वाधिक फटका बसला आहे, ज्यामध्ये ११० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पुराचे पाणी कमी होत असताना सोंगखला प्रांतातील मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे.


दक्षिण थायलंडमधील सर्वात मोठे शहर असलेल्या हात याईमध्ये सर्वाधिक मृतदेह सापडले. आपत्ती विभागाने शुक्रवारी सकाळी वृत्त दिले की, बहुतेक बाधित भागात पाणी कमी झाले आहे.

Comments
Add Comment

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील