गुवाहाटी: आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नसून त्याची हत्या केली असल्याचा धक्कादायक खुलासा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. आसाम राज्यातील विरोधी पक्षाने झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली होती. यावर उत्तर देताना मंगळवारी (२५ नोव्हेंबर) आसामच्या विधानसभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले. तपासकर्त्यांच्या हाती नवे पुरावे लागले असल्याचे ही यावेळी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, झुबेनचा मृत्यू हा 'गुन्हेगारी कट' किंवा 'गुन्हेगारी हत्या' नव्हती. तर ती 'स्पष्ट हत्या' होती. राज्य पोलिसांचे विशेष तपास पथक जुबिनच्या मृत्यूची चौकशी करत आहे. जुबिन गर्गच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने चालला आहे. त्यामुळे मी याबाबत अधिक माहिती देऊ शकत नाही, मात्र या प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांना शिक्षा केली जाईल. आम्ही सरकार म्हणून कुणाचाही बचाव करणार नाही.
मुंबई: संविधान दिनानिमित्त पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा ...
नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी झुबीन गर्ग सिंगापूरला गेला होता. फेस्टिव्हल दरम्यान १९ सप्टेंबर रोजी समुद्रात पोहताना त्याचा मृत्यू झाला. यानंतर नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, झुबीनचा चुलत भाऊ आणि पोलीस अधिकारी संदीपन गर्ग आणि त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नंदेश्वर बोरा आणि प्रबीण वैश्य यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.
जुबिन गर्ग याच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या एक सदस्यीय आयोगाने जबाब नोंदवण्याची आणि पुरावे सादर करण्याची अंतिम मुदत १२ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने ३ नोव्हेंबरपासून घटनेसंदर्भात जबाब नोंदवण्यास आणि पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.






