अमेरिका: जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान वॉशिंग्टन डीसी शहरात आहे, जे व्हाईट हाऊस म्हणून ओळखले जाते. या परिसरात दोन राष्ट्रीय रक्षकांवर गोळीबार झाला. या घटनेत जखमी झालेल्या राष्ट्रीय रक्षकांवर दोन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी या घटनेसंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहले आहे, ज्या व्यक्तीने राष्ट्रीय रक्षकांवर गोळ्या घातल्या तो सुद्धा गंभीर जखमी आहे. तरीही त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आपल्या महान राष्ट्रीय रक्षकांना आणि सर्व लष्करी तसेच कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनावर देवाचा आशीर्वाद राहो. अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रपती कार्यालयाशी संबंधित प्रत्येकजण तुमच्यासोबत आहे. तर वॉशिंग्टन डीसीच्या महापौर म्युरियल बाउसर यांनी हा हल्ला "लक्ष्यित गोळीबार" असल्याचे वर्णन केले.
हाँगकाँग: हाँगकाँगमधील ताईपो भागातील एका निवासी संकुलाला काल (२६ नोव्हेंबर) दुपारी भीषण आग लागली. या अग्नितांडवात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झाला ...
गोळीबार का झाला याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आली नाही आहे. कारण एवढ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी गोळीबार होणे ही गंभीर बाब असल्यामुळे तपास यंत्रणा कुठलीही माहिती घाईगडबडीत देऊ शकत नाही. या घटनेचा तपास करण्यासाठी विविध पथके आता सक्रिय झाली आहेत. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने वॉशिंग्टन डीसीमधून नॅशनल गार्ड काढून टाकण्याच्या फेडरल न्यायाधीशांच्या आदेशाला तात्काळ स्थगिती देण्याची विनंती फेडरल अपील न्यायालयाकडे केली .