२०२२ पासून वेलनेस रिट्रीट्स, क्युरेटेड एक्सपिरीयन्सेस आणि ब्रँडेड रेसिडेन्सेसमुळे लक्झरी किमतींमध्ये वार्षिक ६.७% वाढ
मुंबई:आज कोटक समुहाने कोटक प्रायव्हेट बँकिंगने आज कोटक प्रायव्हेट लक्झरी इंडेक्स (KPLI) चे अनावरण केले आहे. विविध १२ श्रेणीतील लक्झरी उत्पादने आणि ग्राहकांच्या अनुभवांमध्ये अथवा अनुभीतीचा लेखाजोखा व्यक्त करण्यासाठी व लक्झरी वस्तूतील किमतीतील चढउतारांचा मागोवा घेण्यासाठी कंपनीने हा पहिलाच निर्देशक बाजारात आणला आहे. कोटक प्रायव्हेट बँकिंगने निर्देशांक प्रकाशित करण्यासाठी अर्न्स्ट अँड यंग एलएलपी (EY) ला देण्यासाठी नियुक्त केले अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. हा निर्देशांक भारतातील अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ व्यक्ती (UHNIs) लक्झरीकडे असलेला दृष्टीकोन कसा बदलतोय याचे परिमाण स्पष्ट करेल. त्यांच्या मते लक्झरीचा अर्थ कसा बदलत आहेत यावर आकडेवारीतील आधारासह नवीन ट्रेड स्पष्ट करणार आहे.
माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०३० पर्यंत भारताचा लक्झरी बाजार अंदाजे ८५ अब्ज डॉलर्सकडे जात असताना, केपीएलआय (Kotak Private Luxury Index KPLI) स्पष्टपणे बदल दर्शवितो असे समुहाने निवेदनात म्हटले आहे. 'ग्राहकांच्या मालकीकडून अनुभवाकडे आणि भौतिकतेपासून सजग राहणीकडे' या दृष्टिकोनातून या निर्देशांकाची निर्मिती झाली आहे. यामध्ये केवळ गुंतवणूकदार नाही तर ब्रँड आणि सल्लागारांसाठी हा निर्देशांक किंमत वेल्थ व ट्रेंड सेटिंग ट्रॅकरपेक्षा अधिक पातळीवर काम करू शकतो.
याविषयी बोलताना अहवालाचे लाँच करताना, कोटक प्रायव्हेट बँकिंगचे सीईओ ओईशर्य दास म्हणाले आहेत की,'कोटक प्रायव्हेटमध्ये, आमचा असा विश्वास आहे की लक्झरी ही केवळ मालकी हक्काबद्दल नाही तर भारतातील ओळखल्या जाणाऱ्या अल्ट्रा-एचएनआय समुदायासाठी वैयक्तिकरण, कारागिरी आणि वारसा आहे. आमच्या आर्थिक कौशल्याच्या वारशाचा आणि संपत्तीच्या गतिशीलतेबद्दल खोल अंतर्दृष्टीचा फायदा घेत, या अहवालाची पहिली आवृत्ती अनेक मालमत्ता आणि जीवनशैली श्रेणींमध्ये लक्झरीसाठी एक व्यापक बेंचमार्क प्रदान करते. लक्झरी इंडेक्सद्वारे, आम्ही गुंतवणूकदार, ब्रँड आणि सल्लागारांना या दोलायमान परिसंस्थेला (Ecosystem) आकार देणारे ट्रेंड आणि सांस्कृतिक बदल समजून घेण्यासाठी एक मौल्यवान सूचक परिमाण ऑफर करतो. आम्हाला आशा आहे की हे उद्दिष्टाने लक्झरीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक कंपास म्हणून काम करेल, जो क्लायंटना संपत्ती वाढविण्यास आणि त्यांचे जीवन समृद्ध करण्यास करेल.'
निर्देशांक कामगिरी: (Insights)
अहवालातील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२ पासून ६.७% वार्षिक वाढ - केपीएलआय २०२५ मध्ये १२२ पातळीवर पोहोचला आहे जो गेल्या तीन वर्षांत २२% वाढला. आर्थिक २०२५ मध्ये लक्झरी रिअल इस्टेट आणि डिझायनर हँडबॅग्ज सारख्या श्रेणींनी बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी केली असे समुहाने आपल्या निरीक्षणात म्हटले.
नवीन प्रतीक- अमनबाग आणि आनंदा सारख्या आरोग्य रिट्रीट्सने २०२२ पासून कल्याण श्रेणीमध्ये १४.३% वार्षिक वाढ केली आहे, हे दर्शविते की दीर्घायुष्य आणि सजगता आता आधुनिक समृद्धीचे मोलमाप व्यक्त करते.
अनुभव - अंटार्क्टिक क्रूझपासून ते मिशेलिन-तारांकित जेवणापर्यंत, एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स इंडेक्स २०२२ पासून ११.६% वार्षिक वाढला आहे, अहवालातील माहितीनुसार,तो केवळ मालमत्तेसाठीच नाही तर विकासासाठी समृद्धीसाठी आपली 'भूक' दर्शवितो.
लक्झरी रिअल इस्टेट ओळख- ब्रँडेड, तंत्रज्ञान प्रणित घरांची मागणी आर्थिक २०२२ पासून इयर ऑन इयर बेसिसवर १०.८% वाढली आहेत ज्यामुळे रिअल इस्टेट अंतिम संपत्तीचे मोजमाप करण्याचे नवे साधन बनले.
फॅशन होल्ड्स, घड्याळे आणि वाइन योग्य - आर्थिक वर्ष २०२२ पासून डिझायनर हँडबॅग्जमध्ये १०.२% वार्षिक वाढ झाली आहे, तर लक्झरी घड्याळे आणि उत्तम वाइनमध्ये सुधारणा झाल्या आहेत -
वारसा म्हणून शिक्षण - २०२२ पासून एलिट (श्रीमंती) विद्यापीठाच्या शिक्षण शुल्कात वार्षिक ८.४% वाढ झाली आहे, ज्यामुळे शिक्षण हे लक्झरी आणि वारशाचे विधान बनले आहे.
कार्यपद्धती - केपीएलआय १२ श्रेणींमध्ये वर्षानुवर्षे किंमतीतील बदलांचा मागोवा घेते. मूल्य धारणा, यूएचएनआय खर्चाचे नमुने आणि परिमाण यानुसार यातील विविध निष्कर्ष प्राप्त केले जातात. बेस वर्ष म्हणून २०२२ निवडल्यास तुलनात्मक विश्लेषणासाठी पहिले पोस्ट-महामारी (Post Covid Index बेंचमार्क आहे. या श्रेणीत प्राइम रिअल इस्टेट, डिझायनर हँडबॅग्ज, लक्झरी घड्याळे, लक्झरी अनुभव, आरोग्य आणि कल्याण, लक्झरी ऑटोमोबाईल्स, ललित कला, उत्तम दागिने, डिझायनर शूज, एलिट विद्यापीठे, उत्तम वाइन आणि दुर्मिळ व्हिस्की आणि लक्झरी प्रवास यांचा समावेश निर्देशांकात असेल हे स्पष्ट झाले आहे.
हे काय संकेत देते?
जास्त किंमती: वाढती मागणी, टंचाई, ग्राहकांच्या अनुभवांसाठी बदलणारा सांस्कृतिक ट्रेंड
कमी किंमती: बाजारपेठेत सुधारणा किंवा प्राधान्यक्रम बदलणे जसे की पारंपारिक संग्रहित वस्तूंपासून दूर जाऊन अनुभवात्मक लक्झरीकडे जाणे होय.
यावर भाष्य करताना'कोटक प्रायव्हेट लक्झरी इंडेक्स भारतात लक्झरीने किती खोलवर मूळ धरले आहे हे दर्शवितो' असे EY चे भागीदार भाविन सेजपाल म्हणतात. '२०२२ पासून २२% वाढ ही वैविध्यपूर्ण, लवचिक आणि संपत्ती निर्मिती आणि अनुभवांनी प्रेरित परिपक्व होत असलेल्या लक्झरीच्या बाजारपेठेचे संकेत देते. भारतातील अल्ट्रा-एचएनआय लक्झरीला ओळख,वारसा आणि मूल्य जतन म्हणून पुन्हा परिभाषित (Redefined)करत आहेत. रिअल इस्टेट आणि लक्झरीच्या अनुभवांपासून ते वेलनेस ट्रॅव्हलपर्यंत, जागतिक लक्झरीच्या पुढील अध्यायाला आकार देत आहे.'
निर्देशांकात लक्झरीची किंमत आता एखाद्याच्या मालकीबद्दल नाही तर तो कसा जगतो याबद्दल आहे असेही समुहाने निर्देशांक जाहीर करताना स्पष्ट केले आहे. भारतातील हा पहिलाच लक्झरी ट्रॅकर निर्देशांक असणार आहे.