धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी मुंबईतील ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. तरीही मुंबई महानगरपालिकेडून जारी वायू प्रदूषणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) मोजणारे संयंत्र अविरतपणे सुरू राहतील हे सुनिश्चित करावे. ही संयंत्रे बंद आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी दिला आहे.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात वायू प्रदूषणात वाढ निदर्शनास आल्यानंतर वायू प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी या पथकाच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण ५३ बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागातील सिद्धार्थ नगर परिसरातील १७, ‘ई’ विभागातील भायखळा, माझगाव परिसरातील ५, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील ३१ बांधकामांचा समावेश आहे

दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी संवेदक अर्थात सेन्सॉर आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणाऱ्या संयंत्रांच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मंगळवारी २७ नोव्हेंबर २०२५ आढावा घेतला. मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी ६६२ संवेदक (सेन्सॉर) आधारित वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारे संयंत्र बसविण्यात आले आहेत. तर, २५१ संयंत्र प्रस्थापित करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. एकूण ४०० संयंत्रे ही एकत्रित माहिती संकलनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डशी संलंग्नित करण्यात आली आहेत. यापैकी, ११७ संयंत्रे सक्रिय नसल्याचे अर्थात बंद असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावल्या जात असून त्यानंतरही याठिकाणची संयंत्र सक्रिय नसल्याचे आढळून आल्यास विभाग (वॉर्ड) स्तरावर नेमण्यात आलेल्या एकूण ९५ भरारी पथकांच्या माध्यमांतून संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे .

मुंबईतील २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर

बेकरी हेसुद्धा वायू प्रदूषणास कारक घटकांपैकी एक आहेत. मुंबईतील एकूण ५९३ बेकरींपैकी २०९ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या होत्या. महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे ५७ बेकऱ्या स्वच्छ इंधनावर परावर्तित झाल्या आहेत. तर, मागील सहा महिन्यात ७५ बेकऱ्यांनी या परिवर्तनासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच, ८८ बेकऱ्यांनी महानगर गॅस मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
Comments
Add Comment

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही' योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार

मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट

मुंबईत आता मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकाला बंदी..

फुटपाथ आणि गच्चीवरही जाहिरात लावण्यास नसेल परवानगी मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत मागील अनेक महिन्यापासून