रशिया-युक्रेन युद्ध लवकरच संपणार? अमेरिकेच्या करार आराखड्यावर दोन्ही देशांची सहमती

अमेरिका: रशियासोबत युद्ध संपवण्यासाठी प्रस्तावित अमेरिकेच्या करार आराखड्यावर युक्रेनने सहमती दर्शविली आहे. यामुळे मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता लवकरच संपेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की अनेक मुद्दे अद्याप अनुत्तरित आहेत. अबू धाबीमध्ये अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल आणि रशियन प्रतिनिधी यांच्यातील चर्चेदरम्यान हे विधान आले आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याची बहुचर्चित योजना आता सुव्यवस्थित आणि अंतिम झाली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.



अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांनी अबुधाबीमध्ये रशियन अधिकाऱ्यांशी दोन दिवसीय चर्चा केली. या चर्चेत काही किरकोळ मुद्दे अजूनही सोडवायचे असले तरी युक्रेनने शांतता करारावर सहमती दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त युक्रेनचे राष्ट्रीय सुरक्षा सचिव रुस्तम उमरोव यांनी सोशल मीडीयावर पोस्ट करत सांगितले आहे की, "जिनेव्हा येथे झालेल्या युक्रेनियन आणि अमेरिकन शिष्टमंडळांमधील उत्पादक आणि रचनात्मक बैठका आणि युद्ध संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अथक प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. जिनेव्हा येथे चर्चा झालेल्या कराराच्या मुख्य अटींवर दोन्ही बाजूंनी एकमत झाले आहे."



अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेत अनेक गोष्टींचा समावेश होता. ज्या युक्रेनने मागील वाटाघाटींमध्ये नाकारल्या होत्या. युक्रेनला त्याच्या सशस्त्र दलांच्या आकारावरील मर्यादा स्वीकारणे, नाटोमध्ये सामील होण्याचे प्रयत्न सोडून देणे आणि काही प्रदेश रशियाला देण्यास सांगितले होते. या सर्व रशियाच्या दीर्घकालीन मागण्या आहेत, कारण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जास्तीत जास्त सवलती मागत आहेत. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीने रशियाच्या मागण्या नाकारल्या. या ठरावात डोनबास प्रदेशातील मुख्य भाग कीवला सोपवण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. ज्यावर रशियाने कब्जा केला असला तरी हा भाग ते पूर्णपणे नियंत्रित करत नाही. या भागात अशी शहरे आहेत जी युक्रेनच्या संरक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे.


Comments
Add Comment

बंगालच्या खाडीत धोक्याची घंटा; चीन, पाकिस्तान, बांग्लादेशची भारताविरोधात हालचाल

नवी दिल्ली : सध्याच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भारताच्या सुरक्षिततेसमोर नवी आव्हाने उभी ठाकली

अमेरिकेच्या विस्तारवादी भूमिकेला युरोपीय राष्ट्रांचा विरोध

ट्रम्प यांच्या 'धमकी'विरोधात जर्मनी, फ्रान्ससह ७ देश एकवटले वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

थायलंडमध्ये भारतीय पर्यटकाला रस्त्यात तुडवलं; ‘सर्व्हिस’घेतली अन् पैसे कमी दिले

सध्या सोशल मिडिया वर एक व्हिडीओ व्हायरल होतआहे.लैंगिक सेवा पुरवल्यानंतर पैशांवरुन झालेल्या वादातून तृतीयपंथी

अमेरिकेत भारतीय तरुणीची हत्या; एक्स प्रियकराला तामिळनाडूमधून अटक

लास वेगास : अमेरिकेत बेपत्ता झालेल्या २७ वर्षीय भारतीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेरीलँड

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, एक ताब्यात

वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला झाला. ओहायोमध्ये असलेल्या जेडी व्हॅन्स

ट्रम्प यांच्याकडून भारताला करवाढीची पुन्हा धमकी

वॉशिंग्टन : अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला असल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने आता थेट जपानच्या