मुंबईत दुबार, तिबार... १०३ बार मतदार

मुंबईत ४ लाख ३३ हजार मतदारांची नावे दुबार नोंद


दुबार मतदारांची एकूण संख्या ११ लाख ०१ हजार


दुबार मतदारांचा मतदानाचा हक्क शाबूूत, पण हमीपत्रानंतरच...


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून यात ४ लाख ३३ हजार मतदारांची नावे ही दुबार, तिबार तसेच १०३ वेळा नोंद झालेली असून या सर्व मतदारांची एकूण संख्या ही ११ लाख ०१ हजार ५०५ एवढी आहे. ही सर्व दुबार नावे मुंबईच्या हद्दीतीलच आहेत. यासर्व दुबार मतदारांना महापालिकेच्या निवडणूक विभागाचे अधिकारी घरोघरी जावून कल्पना देणार असून त्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद न लाभल्यास प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्यांच्या नावासमोर चिन्हांकित केल्यामुळे त्यांच्याकडून हमीपत्र लिहूनच मतदान करून दिले जाणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांचा मतदानाचा अधिकार हा हमीपत्राच्या आधारे शाबूत राखला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये एकूण मतदारांची संख्या १ कोटी ०३ लाख ४४ हजार ३१५ एवढी आहे. यामध्ये महिला मतदारांची संख्या ४८ लाख २६ हजार ५०९ आहे तर पुरुष मतदारांची संख्या ५५ लाख १६ हजार ७०७ एवढी आहे. तर इतर मतदारांची संख्या १ हजार ९९ एवढी आहे. यामध्ये ११ लाख ०१ हजार ५०५ एवढी आहे. परंतु यातील दुबार मतदारांपैंकी मूळ मतदार हे ४ लाख ३३ हजार एवढेच असून त्यांच्या नावाची नोंद दुबार, तिबार तसेच १०३ बार अशाप्रकारे ही संख्या वाढून ११ लाख ०१ हजार एवढी झाल्याचे माहिती समोर आली आहे. ही दुबार मतदारांची नावे ही मतदाराचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव, आडनाव आणि त्यांचे लिंग याद्वारे दुबार ठरवण्यात आले आहे.


निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुबार तथा तिबार आणि अनेक वेळा नावे असलेल्या मतदारांची नावे चिन्हांकित केलेली आहेत. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाचे कर्मचारी या दुबार असलेल्या मतदारांच्या घरी भेटी देतील तसेच त्यांना कल्पना देवून आपण भविष्यात कुठे मतदान करणार आहे आणि कुठल्या यादीतील नाव वगळले जावे अशाप्रकारे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. परंतु जे दुबार मतदार आहेत, त्यांनी जर प्रतिज्ञापत्र किंवा महापालिकेच्या निवडणूक विभागाशी संपर्क न साधल्यास निवडणुकीपूर्वी मतदान केंद्रनिहाय उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मतदार यादीमध्ये या दुबार मतदारांचाही समावेश असेल. त्यांना प्रत्यक्ष मतदानाची दिवशी मतदान करण्यापूर्वी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून हमीपत्र लिहून घेत मतदान करण्यास परवानगी दिली जाणार आहे. या हमीपत्रात कुठे मतदान करणार आहात आणि याशिवाय कुठेही मतदान करणार नाही आणि अन्य यादीतील नावे वगळण्यात यावी अशाप्रकारचा मसुदा असेल. या हमी पत्राच्या आधारे दुबार नावे असलेल्या मतदाराला कोणत्याही एकाच मतदान केंद्रातच मतदान करता येणार आहे.


मतदार यादीतील सूधारणा आता अशाप्रकारे केल्या जाणार


प्रारुप मतदार यादीतील सुधारणा या छपाईतील चूक, एका प्रभागात दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावे असणे आणि विधानसभा निवडणुकीतील मतदान यादीत नावे होते पण १ जुलैे २०२५च्या मतदार यादीत नावे नसणे आदींच्या चुका आता सुधारीत करण्यात येणार आहे. यासाठी पूर्वी परिशिष्ट एक आणि परिशिष्ट दोन भरुन देण्याची अट आणि त्यासोबत कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करण्याची अट होती, परंतु ही अट काढून एकाच वेळी अनेक मतदारांची नावे समाविष्ठ असणे तथा नसणे आदींबाबतच्या तक्रारी कुणालाही करता येणार आहे. या तक्रारीनुसार महापालिका निवडणूक विभागाचे अधिकारी स्थळ पाहणीसह तपासणी करून मतदान यादी सुधारीत करतील.


सर्वाधिक असलेले पाच प्रशासकीय विभाग




  1. कुर्ला महापालिका एल विभाग : ७८,८२५

  2. भांडुप, विक्रोळी,नाहूर महापालिका एस विभाग : ६९,५००

  3. कांदिवली महापालिका आर दक्षिण विभाग : ६२,३०७

  4. घाटकोपर, विद्याविहार महापालिका एन विभाग : ६१,७०८

  5. विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी पश्चिम महापालिका के पश्चिम विभाग : ५८,४०५



दुबार मतदार सर्वांत कमी असलेले प्रशासकीय विभाग




  1. मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड महापालिका बी विभाग : ८,३९८

  2. फोर्ट, नरीमन पॉईंट,कुलाबा महापालिका ए विभाग : १३,२०४

  3. चंदनवाडी, गिरगाव महापालिका सी विभाग : १४२२४

  4. मुलुंड महापालिका टी विभाग : २९,३२८

  5. भायखळा, नागपाडा महापालिका ई विभाग : ३१,४२२

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या