डॅरिल मिशेलने वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेत दमदार शतकी खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने वनडे फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं होतं. त्याने ७६६ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या रोहित शर्माने ७८१ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत झिम्बाब्वेचा अनुभवी खेळाडू सिकंदर रझा अव्वल स्थानी पोहोचला आहे. सिकंदर रझाने आतापर्यंत २८९ रेटिंग पॉईंट्सची कमाई केली आहे. झिम्बाब्वेचा संघ नुकताच पाकिस्तान आणि श्रीलंकेविरूद्ध तिरंगी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या मालिकेत सिकंदर रझाचा बोलबाला पाहायला मिळाला. त्याने पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजी करताना २३ धावा आणि गोलंदाजी करताना २ गडी बाद केले होते. तर श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३७ धावा करून ४ गडी बाद केले होते. तर पाकिस्तानचा सईय अयुब या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सईम अयुबने २६९ रेटिंग पॉईंट्ससह दुसरे स्थान गाठले आहे.
कसोटी फलंदाजांच्या यादीत ट्रॅव्हिस हेड सहाव्या स्थानी पोहोचला आहे. हेडने इंग्लंडविरूद्ध झालेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीत दमदार शतकी खेळी केली होती. तर इंग्लंडचा स्टार फलंदाज २४ व्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट या यादीत अव्वल स्थानी आहे. जो रूटची रेटिंग ८८४ इतकी आहे. तर हॅरी ब्रूक ८५३ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर केन विलियम्सन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमधील टॉप १० फलंदाजांच्या यादीत यशस्वी जयस्वाल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. यशस्वी जयस्वाल ८ व्या क्रमांकावर घसरला आहे.