राज्य निवडणूक आयोगाने २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींकरता मतदार यादीचा कार्यक्रम दिला असून त्यानुसार प्रत्येक महापालिकेत सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केलेली आहे. यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ ही हरकती व सूचना नोंदण्यासाठी अंतिम तारीख होती. परंतु ही तारीख वाढवून आता ३ डिसेंबर २०१२ करण्यात आली आहे.
तर प्रारुप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेवून प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या बनवून प्रसिध्दी करण्याची तारीख जी ५ डिसेंबर होती, ती वाढवून १० डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. तर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख ८ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर करण्यात आली आहे आणि मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख १२ डिसेंबर ऐवजी आता २२ डिसेंबर करण्यात आली आहे.
प्रारुप मतदार यादीवर हरकती सूचना नोंदवण्याचा कालावधी वाढवून दिला असला तरी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख असल्याने सर्व पक्षांकडून ही कामे तातडीने पूर्ण करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे त्यामुळे आता राजकीय पक्षांसह इतरांनाही घाईघाईत हरकत घेण्याऐवजी यादीवर शेवटची नजर मारण्याची संधी प्राप्त झाली आहे. मंगळवारपर्यंत सहा दिवसांमध्ये ५२९ हरकती सूचना प्राप्त झाल्याने पुढील दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.