T20 World Cup 2026 Full Schedule : ४ गट, २० संघ! २०२६ च्या ICC T-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; संपूर्ण ग्रुप रचना आणि सामन्यांची ठिकाणे; तुमचा आवडता संघ कुठे खेळणार?

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसी विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक अत्यंत खास असणार आहे, कारण ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून, या संघांना प्रत्येकी पाच-पाच संघांच्या चार गटांत (4 Groups) विभागले जाईल. भारतातील आणि श्रीलंकेतील प्रमुख मैदानांवर या विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद अशी असणार आहेत तर श्रीलंकातील कोलंबो आणि कँडी इथे होणार आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, स्पर्धेच्या अंतिम फेरीत (Final) पोहोचणाऱ्या संघांमध्ये क्रिकेटचा थरार अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या या महासंग्रामाचे संपूर्ण वेळापत्रक आज जाहीर झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचेल.



अंतिम सामना अहमदाबाद की कोलंबो?




ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, या विश्वचषकाचा पहिला सामना ७ फेब्रुवारी २०२६ रोजी खेळला जाईल, तर ८ मार्च रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, या अंतिम सामन्याचे ठिकाण (Venue) निश्चित करताना आयसीसीला मोठी अडचण येत आहे, कारण ते अहमदाबाद किंवा कोलंबो या दोन ठिकाणांपैकी एकावर अवलंबून असेल. या संभ्रमाचे मुख्य कारण आहे पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याने, आयसीसीने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे, जर पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला, तर क्रिकेटच्या या महामुकाबल्याचे आयोजन कोलंबो (श्रीलंका) येथे केले जाईल. जर अंतिम सामना पाकिस्तान वगळता अन्य कोणत्याही संघांमध्ये झाला, तर तो भारताच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे, अंतिम सामन्याच्या ठिकाणाचे गुपित स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.



भारताचे टी-२० विश्वचषकातील साखळी फेरीतील सामने (संभाव्य वेळापत्रक)


७ फेब्रुवारी, मुंबई - भारत विरुद्ध अमेरिका (स्पर्धेचा उद्घाटन सामना)


१२ फेब्रुवारी, दिल्ली - भारत विरुद्ध नामिबिया


१५ फेब्रुवारी, कोलंबो - भारत विरुद्ध पाकिस्तान


१८ फेब्रुवारी, अहमदाबाद - भारत विरुद्ध नेदरलँड्स



२०२६ च्या टी-२०विश्वचषकासाठी सर्व चार ग्रुप (संभाव्य)


ग्रुप १ - भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स.
ग्रुप २ - ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान.
ग्रुप ३ - इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ.
ग्रुप ४ - दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅनडा.



टी-२० विश्वचषकासाठी 'या' २० संघांचा समावेश?


भारत, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, बांगलादेश, आयर्लंड, कॅनडा, इटली, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि युएई



भारताने कोरलं दोनवेळा टी-२० विश्वचषकावर नाव


आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) इतिहासात भारतीय संघाने आपली ताकद सिद्ध करत तब्बल दोनवेळा या प्रतिष्ठित ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या कामगिरीमुळे टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी दोनवेळा विजेतेपद मिळवून बरोबरी साधली आहे. तर, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकले आहे.



दोन ऐतिहासिक विजय :


१. पहिला विश्वचषक (२००७) : टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २००७ मध्ये झाली. या पहिल्याच आणि ऐतिहासिक हंगामात भारताने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला थरारक सामन्यात हरवून पहिले विजेतेपद पटकावले होते.


२. दुसरे विजेतेपद (२०२४) : पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर भारताची विजेतेपदाची प्रतीक्षा संपली. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवून दुसऱ्यांदा हा किताब जिंकला आणि जगभरातील चाहत्यांना आनंदाच्या भरात बुडवले.


२००७ ते २०२४ पर्यंतच्या १९ वर्षांच्या प्रवासात भारताने टी-२० क्रिकेटमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे आणि २०२६ च्या विश्वचषकासाठी तयारी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

विजेत्या संघात महाराष्ट्राच्या गंगा कदमचा सिंहाचा वाटा

अंध महिला क्रिकेट विश्वचषकात भारताचा ऐतिहासिक विजय मुंबई : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबो, श्रीलंका

प्रांजली धुमाळला २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक

टोकियो  : भारताच्या प्रांजली प्रशांत धुमाळने टोकियो येथे झालेल्या २५ व्या उन्हाळी डेफलिंपिकमध्ये २५ मीटर

भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत

कोलकाता पाठोपाठ गुवाहाटी कसोटीवरही दक्षिण आफ्रिकेचेच वर्चस्व

गुवाहाटी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने पहिल्या डावात भारताला मोठ्या

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, केएल राहुल कर्णधार

मुंबई : आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सलामीवीर

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या