Stock Market Closing Bell: शेअर बाजारात घरगुती व परदेशी गुंतवणूकदारांचा सापशिडीचा खेळ! अस्थिरतेत शेअर बाजार घसरला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या सत्रात वाढ अपेक्षित होती. मात्र अखेरच्या क्षणी आश्चर्याचा भाग न वाटता व दिवसभरात अस्थिरतेचा फटका बाजारात बसला असतानाच बाजारात सेल ऑफ अथवा नफा बुकिंग सुरू झाल्याने बाजार घसरणीकडे ढकलला गेला. सेन्सेक्स ३१३.७० व निफ्टी ७४.७० अंकाने कोसळला असल्याने सेन्सेक्स ८४५८७.०१ पातळीवर व निफ्टी २५८८४ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकाने किरकोळ घसरण नोंदवल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळण्यास अपयश आले आहे. मात्र विशेष उल्लेख म्हणजे सेन्सेक्स नेक्स्ट ५० निर्देशांकात ३८४.०२ अंकाने वाढ झाली आहे.


विशेषतः आज लार्जकॅप शेअर्समध्ये पडझड कायम राहिली होती. तर अपेक्षेप्रमाणे स्मॉलकॅप शेअरने चांगली कामगिरी केली असल्याने बाजारात घसरण मर्यादित राहिली. आज मेटल, पीएसयु बँक, रिअल्टी, मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.९२%) निर्देशांकात वाढ झाली असली तरी सर्वाधिक घसरण फायनांशियल सर्विसेस (०.३५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.५८%), मिडिया (०.७६%) निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा ७.९९ पातळीवर घसरला असला तरी अनपेक्षितपणे बाजारातील घसरणीकडेच अधिक कौल राहिला. याचे प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात आज अखेरच्या सत्रात निफ्टी १०० (०.२५%), निफ्टी २०० (०.१४%), निफ्टी ५०० (०.१२%) निर्देशांकात घसरण झाली असून मिडकॅप सिलेक्ट (०.४६%), मिडकॅप ५० (०.५४%), निफ्टी नेक्स्ट ५० (०.२५%) निर्देशांकात वाढ झाली.


आज दिवसभरात अस्थिरता कायम असताना हाच फटका कमोडिटी बाजारातही बसला असल्याने सलग दुसऱ्यांदा सोने मोठ्या प्रमाणात उसळले आहे. सकाळी कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही घसरण झाली होती ती मात्र व्याजदर कपातीच्या आशावादावर घसरलाच आहे. रुपयातही कालपासून घसरत असलेल्या डॉलर निर्देशांकांमुळे आज पुन्हा दुपारपर्यंत ४ पैशाने वाढ झाल्याने रूपया ८९.२१ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे.


आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात एस अँड पी ५०० (१.५५%), नासडाक (२.६८%) तुफान उसळले असून डाऊ जोन्स (०.११%) मध्ये मात्र घसरण झाली. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील तेजी काही प्रमाणात अधिक राहिली असली तरी आकडेवारीवरून अस्थिरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. गिफ्ट निफ्टी (०.२७%) वाढीसह हेंगसेंग (०.८५%),तैवान वेटेड (१.५२%), सेट कंपोझिट (१.२६%), शांघाई कंपोझिट (०.८६%) निर्देशांकात मोठी वाढ झाली असून जकार्ता कंपोझिट (०.५६%), स्ट्रेट टाईम्स (०.२६%), निकेयी (०.०१%) निर्देशांकात घसरण झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचईजी (५.७४%), क्राफ्ट्समन ऑटो (५.४२%), सेंच्युरी फ्लायबोर्ड (४.९२%), हिमाद्री स्पेशल (४.४२%), अनंत राज (४.१४%), आदित्य बिर्ला कॅपिटल (४.१२%), आय आय एफ एल फायनान्स (३.८४%), ब्लू जेट हेल्थ (३.७६%), सारडा एनर्जी (३.४४%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण आयटीआय (४.३४%), हनीवेल ऑटो (३.६१%), राईट (३.५४%), आरसीएफ (३.३५%), एससीआय (२.९८%), क्लीन सायन्स (२.९८%), टाटा कम्युनिकेशन (२.९२%), किर्लोस्कर ब्रदर (२.८८%), अदानी एंटरप्राईजेस (२.७६%), पीव्हीआर आयनॉक्स (२.७०%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'मासिक समाप्तीच्या दिवशी स्थानिक बाजारात तीव्र अस्थिरता दिसून आली, जी कमकुवत रूपया आणि सतत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार बाहेर पडल्यामुळे झाली. काही सुधारणांचे संकेत असूनही, गुंतवणूकदार आगामी FOMC बैठकीत संभाव्य व्याजदर कपात आणि भारत-अमेरिका व्यापार करारावरील प्रगतीबद्दल स्पष्टतेची वाट पाहत असल्याने सावधगिरी बाळगली गेली. विक्रीचा दबाव २६००० पातळीच्या जवळ दिसून येत आहे, जरी दुसऱ्या सहामाहीसाठी मजबूत कमाईचा अंदाज यासह मजबूत देशांतर्गत मूलभूत बाबींमुळे घसरण मर्यादित दिसते. गृहकर्ज मागणीत मजबूत पुनरुज्जीवन आणि PSU बँकांसाठी वाढत्या बाजार हिस्सा यामुळे PSU बँका आणि रिअल इस्टेट समभागांनी चांगली कामगिरी केली.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'नोव्हेंबर महिन्याच्या समाप्तीच्या दिवशी भारतीय बाजारांमध्ये घसरण दिसून आली, बेंचमार्क निफ्टी निर्देशांक तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा २६००० पातळीच्या आसपास होता. क्षेत्रीयदृष्ट्या, रिअल्टी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फार्मा, आरोग्यसेवा आणि धातू क्षेत्रातील खरेदीदारांच्या संख्येत वाढ झाली, तर मीडिया, आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कमकुवतपणा कायम राहिला. जागतिक स्तरावर, पुढील महिन्यात अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढताना वॉल स्ट्रीटवरील उत्साही सत्रामुळे भावनांना पाठिंबा मिळाला. डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, PHOENIXLTD, RECLTD, HFCL, ULTRACEMCO आणि HDFCLIFE मध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट सपोर्ट दिसून आला, जो बाजारातील सहभागींची मजबूत स्थिती दर्शवितो. २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या साप्ताहिक समाप्तीसाठी निफ्टी ऑप्शन्स फ्रंटवर, २६००० आणि २६२०० स्ट्राइक लेव्हलवर लक्षणीय कॉल बिल्डअप नोंदवण्यात आला, तर पुटच्या बाजूने, २६००० आणि २५५०० पातळीवर लक्षणीय वाढ दिसून आली.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'सलग तिसऱ्या सत्रात निर्देशांकाने मंदीचा कॅंडलस्टिक बनवला, पुन्हा एकदा ५९२०० ओलांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्या पातळीवर विक्रीचा दबाव आला. आरएसआय आता दैनिक चार्टवर मंदीच्या क्रॉसओवरमध्ये गेला आहे, ज्यामुळे सावधगिरीचा सूर वाढला आहे. या तांत्रिक वाचनांवरून असे दिसून येते की पुढील दोन ते चार सत्रांमध्ये निर्देशांक बाजूला ते सौम्य मंदीच्या ट्रेंडमध्ये व्यापार करू शकतो, २० दिवसांच्या ईएमएकडे ५८३००-५८४०० पातळीवर रिट्रेसमेंट होण्याची शक्यता आहे. तात्काळ आधार (Immdiate Support) ५८३०० पातळीवर दिसतो, प्रतिकार (Resistance) ५९२०० पातळीवर राहतो, तर स्थितीगत आधार ५८००० पातळीच्या जवळ आहे.'

Comments
Add Comment

Tata Sierra Launch: १९९१ नंतर भारतात टाटा सिएराचे जोरदार 'पुनरागमन' 'ही' असेल किंमत, नव्या अंदाजात मिड प्रिमियम एसयुव्ही सेगमेंटमध्ये लाँच

मोहित सोमण: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (TMPV) कंपनीने आपले मिड लक्झरी एसयुव्ही सेगमेंगमध्ये जोरदार पुनरागमन करत

Navi Limited NFO: नवी म्युच्युअल फंडाकडून भारतातील पहिला निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० इंडेक्स फंड एनएफओ लाँच

मोहित सोमण: नवी म्युच्युअल फंड (Navi Mutual Fund) कंपनीशी संबंधित नावी एएमसी लिमिटेड (Navi AMC Limited) कंपनीने भारतातील पहिला इंडेक्स

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने केला श्रीराम ग्रीन फायनान्सशी करार

प्रतिनिधी: ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्सने केला श्रीराम ग्रीन फायनान्सशी एक करार केला आहे. या भागीदारीचा उद्देश

द. आफ्रिकेची स्थिती मजबूत, गुवाहाटी कसोटी अनिर्णित राहणार की भारत हरणार ?

गुवाहाटी : गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाचा खेळ जसजसा पुढे सरकतोय, तसतसा भारताचा पराभव जवळ

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले