ठाण्यात तस्कराला बेड्या; पाच कोटींचे चरस पकडले

ठाणे: पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शनवर अली (३८) असे या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ५ कोटी ५० लाखांचे चरस जप्त केले आहे. त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपायुक्त अमरसिहं जाधब, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना साकेत रोड ते बाळकुम पाडा २ दरम्यान एक तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनवर अन्वर अली वय ३८ वर्ष याच्या मुसक्या आवळल्या. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून ५०५ ग्रॅम वजनाचे दहा पाकीट चरस मिळाले. तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता? हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये

ठाण्यात अजित पवार आजमावणार स्वबळ

तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीत ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ; डिसेंबरमध्ये आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा

ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाला मिळणार गती

ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदा ठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र

ठाणे-बोरिवली भुयारीकरणाला मार्चपासून सुरुवात

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग

उल्हास खाडी प्रदूषित रसायनांचा साठा जप्त

ठाकुर्लीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडू्न कारवाई डोंबिवली  : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली, कचोरे गाव हद्दीतील