मोहित सोमण: नवी म्युच्युअल फंड (Navi Mutual Fund) कंपनीशी संबंधित नावी एएमसी लिमिटेड (Navi AMC Limited) कंपनीने भारतातील पहिला इंडेक्स फंडशी संदर्भात निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० निर्देशांकावर आधारित एनएफओ (New Fund Offer NFO) बाजारात आणण्याची घोषणा कंपनीने केली आहे. नवी लिमिटेड अंतर्गत नावी म्युच्युअल फंड कंपनी काम करते. या ब्रँड अंतर्गत कंपनीने मिडस्मॉलकॅप ४०० इंडेक्स आधारित एनएफओ भारतात आणला आहे. हा निर्देशांक प्रामुख्याने निफ्टी मिडकॅप १०० व निफ्टी मिड व स्मॉल कॅप २५० इंडायसेस आधारित असणार आहे असे कंपनीने स्पष्ट केले. या निर्देशांकातील कंपन्यांच्या आधारे हा फंड पोर्टफोलिओ उभारला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. माहितीनुसार, २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कंपनीचा एनएफओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. १०० रुपयांपासून पुढे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे या योजनेत शक्य होणार आहे.
या फंडाचा प्रमुख उद्देश निफ्टी मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये होत असलेल्या वाढीचा लेवरेज (फायदा) घेऊन गुंतवणूकदारांना परतावा (Returns) मिळून देणे आहे अर्थात हे उद्दिष्ट संपूर्ण होईलच ही खात्री देऊ शकत नसल्याचे कंपनीने आपल्या खबरदारीत स्पष्टपणे म्हटले आहे. १५० मिड व २५० स्मॉल कॅप शेअरचा समावेश या फंडात असू शकतो. या ४०० कंपन्यांतील उपलब्ध असलेल्या फ्री फ्लोट(बाजारात उपलब्ध असलेले शेअर) असलेल्या शेअरपैकी पोर्टफोलिओ व्यवस्थापक या निर्देशांकातील कंपनीच्या समभागात गुंतवणूक करतील अशी प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे.
कंपनीने याविषयी अधिक माहिती देताना म्हटले आहे की,'ही योजना निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० टोटल रिटर्न इंडेक्सची प्रतिकृती बनवेल, जो ४०० कंपन्यांचा (१५० मिड-कॅप आणि २५० स्मॉल-कॅप स्टॉक) समावेश असलेला फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन-वेटेड इंडेक्स आहे. एनएसई इंडेक्सेसने निर्धारित केलेल्या पद्धतीनुसार निर्देशांक राखला जातो आणि पुनर्संतुलित केला जातो.'
या फंडाबाबत अधिकृत प्रतिक्रिया देताना नवी एएमसी लिमिटेडचे सीईओ आदित्य मुलकी म्हणाले आहेत की,' मिड आणि स्मॉलकॅप कंपन्या भारताच्या विकासाच्या कथेत आघाडीवर आहेत, तरीही या विभागात वैविध्यपूर्ण आणि किफायतशीर पद्धतीने प्रवेश मिळवणे हे अनेक गुंतवणूकदारांसाठी एक आव्हान राहिले आहे. नवी निफ्टी मिडस्मॉलकॅप ४०० इंडेक्स फंडसह,आम्ही एका, व्यापक-आधारित निर्देशांकाद्वारे या संधीमध्ये सहभागी होण्याचा एक सोपा मार्ग देत आहोत. आमचे लक्ष पारदर्शक,नियम-आधारित उत्पादने तयार करण्यावर आहे जे गुंतवणूकदारांना गुंतागुंतीशिवाय दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करतात.'
कंपन निष्क्रिय (पॅसिव) नियमांवर आधारित आणि सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या धोरणांमध्ये विविध म्युच्युअल फंड उत्पादने गुंतवणूकदारांना ऑफर करते. कंपनी सर्व गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशातून अधिक मूल्य मिळविण्यासाठी गुंतवणूक सोपी, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेल्या ग्राहक दृष्टिकोनाचे अनुसरण करते असेही कंपनीने घोषणेदरम्यान गुंतवणूकदारांना उद्देशून म्हटले आहे.
टीप- म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन आहे, सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.






