संरक्षक कठड्यांना धडकून भोगावनजीक मिनी बस दरीत

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामाग क्रमांक ६६ वर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगाव बुद्रुकनजीक सोमवार पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्वारगेट पुणे ते दापोलीपर्यंत जाणारी खासगी मिनी बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे रिफ्लेक्टर नसलेल्या लोखंडी संरक्षक कठडयांना धडक देत लोखंडी कठडयांसह अंदाजे ४५ ते ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील १० प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.


गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर ते खेड दरम्यानच्या भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. पहाटे धुके असल्याने रिफ्लेक्टर नसलेले लोखंडी संरक्षक कठडे चालक सूरज अलकुंटे याच्या नजरेस न पडल्याने या लोखंडी संरक्षक कठडयांना मिनी बसची धडक बसताच लोखंडी कठडेदेखील काँक्रीटने जमिनीत ठासले नसल्याने लोखंडी कठड्यांसह मिनीबस थेट दरीत कोसळली. यावेळी बसमधील प्रवाशांच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलादपूर पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना खेड-कळंबणी येथील रत्नागिरी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले. खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शामल आंजर्लेकर, काजल शिगवण, दिलीप मोहिते, अमरनाथ कांबळे, दीपाली काचरे, प्रतीक गुरव, प्रिया गुरव, आनंदी नाचरे, सर्वेश गुहागरकर, मुजिब दलाल, मयुरी शिगवण याशिवाय चालक, वाहक तसेच इतर ९ प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वीज कंत्राटी कामगारांना १३ वर्षांनी न्याय

आंदोलनांना यश, २,२८५ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी अलिबाग : वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या दीर्घ

रायगडमधील ईव्हीएम स्ट्राँग रूम उंदरांनी फोडली?

कपाटाचे दरवाजे उघडल्याने एकच खळबळ अलिबाग : येत्या २१ डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी पार

नागावमधील बिबट्या आता आक्षी साखरेत!

बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी नांदगाव मुरुड : नागावमधून वनखात्याच्या कर्मचारी व ग्रामस्थांना चकवा दिलेला

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५० शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

शैक्षणिक सहली, लग्नसमारंभांसाठी 'लालपरी' सुसाट

खासगी वाहनांपेक्षा एसटीतून होणार पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास स्वप्नील पाटील पेण : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या