मोहित सोमण:सकाळी अस्थिरतेत चढउतार करत असलेल्या रूपयाने डॉलरच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. सुरूवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल ४९ पैशाने उसळला असल्याने ८९.१७ रूपये प्रति डॉलर दरपातळी गाठण्यास भारतीय रूपयाला यश आले. शुक्रवारी व शनिवारी रूपया निच्चांकी स्तरावर बाजारात व्यवहार करत होता. मोठ्या प्रमाणात रूपयात घसरण झाल्याने रूपया ८९.४३ या पातळीवर कोसळला होता तो ४९ पैशाने रिबाऊंड झाल्याने आज रूपया सुरूवातीच्या कलात ८९.१७ रूपयांवर पोहोचला आहे. मोठ्या प्रमाणात रूपयात सुधारणा झाल्याने जागतिक स्तरावरील भारतीय व्यवहाराय याचा फायदा होऊ शकतो.
युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का यावरील अनिश्चितता गेल्या आठवड्यात असताना डॉलरच्या तुलनेत पूर्वेकडील देशांचे व विशेषतः आशियाई देशांचे चलन युएस डॉलरपेक्षा घसरत होते तर डॉलरच्या निर्देशांकात सातत्याने वाढ झाल्याने रूपयाने परवा खराब कामगिरी केली. मात्र सकारात्मक जागतिक संकेतानुसार भारतीय शेअर बाजारासह चलनी बाजारात स्थैर्य आलेले सकाळी पहायला मिळाले. बाजार तज्ञांनी युएस फेड दरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली असताना एका फेड गव्हर्नरने आपल्या भाषणात काल दरकपातीचे संकेत दिले त्याचा फायदा युएस बाजारातील डाऊ जोन्समधील वाढीसह भारतीय बाजारात परावर्तित केला आहे.
चलन व्यापारी सावधपणे आशावादी आहेत असेही चलन व्यवस्थापन तज्ञांनी म्हटले आहे. फिनरेक्स ट्रेझरी अँडव्हायझर्स एलएलपीचे ट्रेझरी प्रमुख आणि कार्यकारी संचालक अनिल कुमार भन्साळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की,'बहुतेकांचा असा विश्वास आहे की पुढील काही आठवड्यांसाठी रुपया प्रति डॉलरच्या मानसिक पातळीपेक्षा ९० च्या पातळीवर जाऊ शकतो, विशेषतः डिसेंबर अखेरपर्यंत अपेक्षित भारत-अमेरिका व्यापार करारावर बाजारपेठ प्रगतीची वाट पाहत असताना. तथापि, त्यांनी इशारा दिला की कोणताही ब्रेकथ्रू न मिळाल्यास ९० चा टप्पाही लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो.'
दरम्यान सकाळी डॉलर निर्देशांक १००.१८ वर किंचित जास्त होता तथापि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी देशांतर्गत बाजारपेठांवर दबाव आणत भारतीय शेअर बाजारातील १७६६.०५ कोटी रुपयांचे शेअरची विक्री केली. तसेच मोठ्या प्रमाणात त्यादिवशी पैशाची जावकही वाढली. आज परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका महत्वाची असेल परंतु आरबीआयच्या हस्तक्षेपी निर्णयाचा रूपयांच्या दरपातळीवर परिणाम होईल. सकाळी १०.४० वाजता डॉलरच्या निर्देशांकातही ०.०१% वाढ झाली आहे त्यामुळे रूपयांचे पुनरागमन यशस्वी ठरते का अवमूल्यन होते ते अखेरच्या सत्रातही स्पष्ट होईल.