Pakistan: पेशावरमध्ये फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरीच्या मुख्यालयावर हल्ला

पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा दहशतवादाच्या रडारवर आला आहे.२४ नोव्हेंबरला सोमवारी पहाटे पेशावरमधील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी करत सुरक्षा दलाने तातडीने प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले. संपूर्ण परिसराला वेढा घालून रोडमार्ग बंद करण्यात आले आहेत.


कॅपिटल पोलिस अधिकारी डॉ. मियां सईद अहमद यांनी सांगितले की एफसी मुख्यालयावर अचानक हल्ला झाला आणि जवानांनी त्वरित मोर्चा उघडला. सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्यानंतर सतत गोळीबार सुरू झाला. या कारवाईदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरु आहे. कॉम्प्लेक्समधील सर्व इमारती आणि परिसराची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे.




 घटनेची वेळ सकाळी ८:१० ची असल्याचे व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटजेमध्ये दिसत आज  दोन तीव्र स्फोट आणि त्यानंतरचा अंधाधुंद गोळीबार यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आणि सुरक्षा दलांनी सोनेरी मस्जिद रोड तात्काळ बंद करून मोठी नाकेबंदी केली.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज आणि धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांची मालिका सुरू आहे. २०२२ मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने युद्धबंदी मोडून सुरक्षा दलांवर हल्ले वाढवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त