पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत पुन्हा एकदा दहशतवादाच्या रडारवर आला आहे.२४ नोव्हेंबरला सोमवारी पहाटे पेशावरमधील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी करत सुरक्षा दलाने तातडीने प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले. संपूर्ण परिसराला वेढा घालून रोडमार्ग बंद करण्यात आले आहेत.
कॅपिटल पोलिस अधिकारी डॉ. मियां सईद अहमद यांनी सांगितले की एफसी मुख्यालयावर अचानक हल्ला झाला आणि जवानांनी त्वरित मोर्चा उघडला. सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिल्यानंतर सतत गोळीबार सुरू झाला. या कारवाईदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरु आहे. कॉम्प्लेक्समधील सर्व इमारती आणि परिसराची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे.
घटनेची वेळ सकाळी ८:१० ची असल्याचे व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटजेमध्ये दिसत आज दोन तीव्र स्फोट आणि त्यानंतरचा अंधाधुंद गोळीबार यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस आणि सुरक्षा दलांनी सोनेरी मस्जिद रोड तात्काळ बंद करून मोठी नाकेबंदी केली.View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज आणि धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांची मालिका सुरू आहे. २०२२ मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने युद्धबंदी मोडून सुरक्षा दलांवर हल्ले वाढवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.






