भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत घेणार आज शपथ!

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. भारताच्या ५३व्या न्यायमूर्तींचा शपथविधी राष्ट्रपती भवनात होणार आहे. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ सुमारे १४ महिन्यांचा असणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती, बदली आणि पदोन्नतीचे नियमन करणाऱ्या कायद्यानुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाते. या परंपरेनुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३वे सरन्यायाधीश होणार आहेत.



न्यायमूर्ती सूर्यकांत यांची ओळख?


न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायधीश म्हणून शपथ घेणार आहेत. संवैधानिक, सेवा आणि नागरी कायद्यातील कौशल्यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. या कालावधीत त्यांनी भारतातील विविध न्यायालये आणि कायदेशीर संस्थांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत.


हरियाणातील हिसार येथे १० फेब्रुवारी १९६२ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि त्याच वर्षी हिसार येथील जिल्हा न्यायालयात सराव सुरू केला.


१९८५ मध्ये ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सराव करण्यासाठी चंदीगडला गेले, जिथे त्यांनी संवैधानिक, सेवा आणि दिवाणी बाबींमध्ये कौशल्य मिळवले. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, बँका आणि उच्च न्यायालयातही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.


९ जानेवारी २००४ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे ५ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली.


१२ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत करत होते.

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिरावर उद्या ध्वजारोहण

ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी

‘आयएनएस माहे’ आज भारतीय नौदलात

मुंबई : भारतीय नौदलाची सामरिक ताकद अधिक भक्कम करणारा सोहळा सोमवारी पाहायला मिळणार आहे. माहे-क्लास अँटी सबमरीन

मेट्रो शहरांमधील विषारी हवेने मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

नवी दिल्ली : वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत

'आयुष्मान भारत'अंतर्गत सत्तरीनंतर १० लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली : भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील

‘सिंध पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूतोवाच नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानात असलेला ‘सिंध प्राप्त पुन्हा भारताचा

ऐतिहासिक! नव्या सरन्यायाधीशांच्या शपथविधीला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती राहणार उपस्थित

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. भारताच्या ५३व्या