१ शेअरवर मिळवा २४ शेअर फ्री 'या' कंपनीकडून बोनस इशूसाठी ५ डिसेंबर अंतिम तारीख

मोहित सोमण:एपिस इंडिया या बीएसईवरील सूचीबद्ध (Listed) असलेल्या शेअरने गुंतवणूकदारांसाठी धमाल गिफ्ट आणले आहे. एक शेअर खरेदी केल्यास २४ शेअर बोनस मिळणार आहेत. २४:१ या गुणोत्तरात हे शेअर मिळणार आहेत असे कंपनीने आपल्या एक्सचेंज निवेदनात म्हटले आहे. १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअरची अंतिम नोंदणी दिनांक (रेकॉर्ड डेट) ५ डिसेंबर असणार आहे. त्यामुळे ५ तारखे आधी शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना या ऑफरचा लाभ होणार आहे. एपिस इंडियाने ही संबंधित माहिती घोषित करुन हे शेअर पूर्णपणे पेडअप (Fullly Paid) शेअर असतील असेही यावेळी स्पष्ट केले आहे.


यापूर्वी कंपनीने डिसेंबर २०१० मध्ये ३२३: १०० प्रमाणात बोनस शेअर इशू जाहीर केला होता. कंपनी प्रामुख्याने मधाचे उत्पादन करते त्याशिवाय इतर खजूर, चहाळ जाम, व संबंधित एफएमसीजी उत्पादने कंपनी बाजारात आणते. कंपनीने गेल्या आठवड्यात ५% वाढ नोंदवली असून गेल्या महिनाभरात कंपनीने २१.५४% वाढ नोंदवली आहे. तर संपूर्ण एक वर्षात ३११.१२% परतावा कंपनीने गुंतवणूकदारांना दिला आहे. दरम्यान कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६०४.९० कोटी रूपये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ (All time High) १०९७.९० रूपयावर नोंदवली गेली असून ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण (All time Low) २८०.४० रूपये प्रति शेअरवर नोंदवली गेली आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर सप्टेंबर तिमाहीत १९.६७% अधिक महसूल मिळाला होता तर कंपनीच्या नफ्यात तिमाही बेसिसवर ५.५१% वाढ नोंदवली होती.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 IND vs PAK: सूर्यकुमार यादवने केली उस्मान तारिकची नक्कल; व्हिडीओ वायरल

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Ajit Pawar: छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा

लंडन: छत्रपती शिवाजी महाराज युवक संघठना तर्फे आज लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

Mhada Lottery Home: म्हाडाकडून सर्वसामान्यांना दिलासा; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल

मुंबई: आगामी काळात 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर