मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी पर्वाला उजाळा देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतल्या एका सुवर्ण अध्यायाचा अंत झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले की, ब्लॅक अँड व्हाईटच्या काळापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत धर्मेंद्र यांनी सातत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. स्वप्नाळू आणि आत्मीय तरुण नायकापासून ते बलदंड, तडफदार व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकांपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतंत्र छाप उमटवली. कालांतराने ‘ही-मॅन ऑफ बॉलिवूड’ म्हणून मिळालेली त्यांची ओळख त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देते.


शोलेमधील वीरूची मैत्री जशी पडद्यावर अजरामर झाली, तशीच मैत्री आणि जिव्हाळा जपणारी त्यांची स्वाभाविक वृत्ती वास्तवातही जाणवायची, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जुन्या आणि नव्या दोन्ही पिढ्यांना जोडणारा सेतू म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिले जात असे. अनेकांचे ते मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान होते.


चित्रपटसृष्टीसोबतच त्यांनी बिकानेरचे लोकसभा प्रतिनिधित्व करत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणूनही कार्य केले. मात्र अभिनय आणि सर्जनशील प्रयोगशीलता यांनाच त्यांनी सदैव महत्व दिले. तीनशेहून अधिक चित्रपटांत त्यांच्या बहुरंगी भूमिका पाहायला मिळतात. एकाच वर्षी नऊ हिट चित्रपट देण्याचा त्यांच्याकडे असलेला विलक्षण विक्रम आजही सिनेसृष्टीत अभिमानाने आठवला जातो.


आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते सिनेसृष्टीत सक्रिय राहिले, हा त्यांचा व्यासंग आणि समर्पणाचा सर्वोच्च नमुना असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांसह कोट्यवधी चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही मन:पूर्वक सहभागी आहोत आणि ईश्वर सर्वांना धैर्य देओ, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,