मुंबई : आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सलामीवीर शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे पूर्णतः बरा न झाल्याने या मालिकेतून बाहेर राहणार आहे. त्याच्याऐवजी केएल राहुल विकेटकीपिंगसोबतच संघाचे नेतृत्व देखील करणार आहे. संघात दुसरा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत खेळणार आहे. तर मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरलाही दुखापतीमुळे संधी मिळू शकली नाही.
युवापिढीचा आक्रमक फलंदाज ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर पुन्हा भारतीय संघात दमदार कमबॅक केला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी सादर करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले.
संघात अनुभवी फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल यांसारखे खेळाडू आहेत, तर तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, हर्षित राणा यांसारखे तरुण खेळाडू संघात चमक दाखवणार आहेत. ऑलराउंडर्स रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव संघाचा बॅलन्स अधिक मजबूत करतील. बॉलिंगच्या जबाबदाऱ्या प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांच्यावर राहणार आहेत.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या आगामी तीन वनडे सामन्यांसाठी घोषणा झालेल्या भारतीय संघात फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. केएल राहुल संघाचा कर्णधार असून त्याचबरोबर विकेटकीपिंगची जबाबदारी पार पाडणार आहे, तर ऋषभ पंत दुसरा विकेटकीपर म्हणून संघात आहे. ऑलराउंडर खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे, तर गोलंदाजीच्या विभागात प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल.
वनडे मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
पहिला सामना ३० नोव्हेंबरला रांची येथे, दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूर येथे आणि तिसरा सामना ६ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.