१७ ठिकाणी दुरंगी लढत, चार ठिकाणी तिरंगी सामना

कर्जत : शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर कर्जत नगरपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंधरा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या सतरा ठिकाणी दुरंगी लढत तर चार अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन उमेदवारांनी निवणुकीतून माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस - उबाठा परिवर्तन आघाडीच्या पुष्पा हरिश्चंद्र दगडे आणि भारतीय जनता पक्ष - शिवसेना - आरपीआय महायुतीच्या डॉ. स्वाती अक्षय लाड यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.


प्रभाग एक ‘अ’मध्ये जयदीप कृष्णा पाटील अपक्ष उमेदवारी लढवीत असल्याने तेथे तिरंगी लढत तर प्रभाग एक ‘ब’मध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग दोन अ आणि ब, प्रभाग तीन अ आणि ब, प्रभाग चार अ आणि ब आणि प्रभाग पाच ‘अ’ मध्ये एकास एक उमेदवार असल्याने सरळ लढत तर प्रभाग पाच ‘ब’ मध्ये उमेश अर्जुन शेलार हे अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा अ आणि ब, प्रभाग सात अ आणि ब, प्रभाग आठ अ आणि ब मध्ये सरळ लढत आहे. प्रभाग नऊ अ मध्ये राजेश पिराजी साळुंखे अपक्ष निवडणूक लढवीत असल्यामुळे या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग नऊ ‘ब’मध्ये दुरंगी लढत आहे. प्रभाग दहा ‘अ’ आणि ‘क’ मध्ये दुरंगी लढत होणार आहे, तर प्रभाग दहा ‘ब’मध्ये नितेश राजेंद्र बाचल अपक्ष उमेदवार असल्याने तिरंगी लढत पाहायला मिळेल.


या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षासह काही प्रभागात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यांनी सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने ते निवडणुकीतून बाहेर पडले. या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रभाग सहा ‘ब’मधील उमेदवार प्रशांत वसंत पाटील यांनी नामनिर्देशन पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दाखल केले मात्र ए बी फॉर्म उबाठा शिवसेनेचा दिल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सुद्धा अर्ज दाखल केल्याने ते निवडणूक रिंगणात राहिले. ते कर्जत परिवर्तन विकास आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना २६ नोव्हेंबर रोजी निशाणी मिळणार असल्याने ते सध्या निशाणी विना प्रचार करीत असून त्यांनी रिक्षा निशाणी मागितली आहे. अन्य चार अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावीत असले तरी त्यांना मिळणाऱ्या मतांमुळे अटीतटीच्या लढतीत एखाद्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

बुधवारी मुख्यमंत्री पेणमध्ये; फोडणार प्रचाराचा नारळ

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध ही पुन्हा सत्ता स्थापनेची नांदी  स्वप्नील पाटील पेण : राज्यातील नगर परिषदेच्या

रोहा नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत

नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ४९ जण रिंगणात सुभाष म्हात्रे रोहा : रोहा नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उबाठाच्या

रायगडमध्ये निवडणूक रिंगणात वारसदारांचीच चलती

राजकीय गड सांभाळण्यासाठी राजकारणात लेकी-सुनांचा सहभाग सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात दहा

रायगडमध्ये दोन मंत्री, पाच आमदार, तीन खासदारांची प्रतिष्ठा पणाला !

नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे ऐन थंडीत वातावरण तापले सुभाष म्हात्रे अलिबाग (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकांची

अलिबाग प्रभाग दोनमधून ॲड. प्रशांत नाईक बिनविरोध

अलिबाग  : अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आघाडीने विजयाचा गुलाल उधळला असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट)

ताम्हिणी घाटात थार अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू

पनवेल : ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-माणगाव