हार्बर व ट्रान्स-हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नाही
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी २३ नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग व ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले.
ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग व ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ९.३४ ते ३. ३ वाजताच्या दरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद - अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या सेवा कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवरही थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिरा पुढील स्थानकावर पोहचतील.
कल्याण येथून १०.२८ ते ३.४० वाजताच्या दरम्यान सुटणाऱ्या अप जलद -अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील.
पश्चिम रेल्वेवर ६ तासांचा बंद
पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान फास्ट मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर काही कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात जलद मार्गावर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शुक्रवारी आणि शनिवारच्या मध्यरात्री (२२ नोव्हेंबर रोजी) सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा रात्रकालीन ब्लॉक ११.५५ ते २.५५ दरम्यान अप जलद मार्गावर आणि रात्री १.३० ते पहाटे ४.३० दरम्यान डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकमुळे विरार- भरूच मेमू ट्रेन १५ मिनिटे उशिराने धावेल आणि विरार स्थानकावरून पहाटे ४.३५ च्या ऐवजी पहाटे ४.५० वाजता सुटेल. या ब्लॉकचा कोणत्याही लोकलवर परिणाम होणार नाही. सर्व पश्चिम रेल्वेवरील लोकल रात्री आणि सकाळी आपापल्या वेळेत धावतील.






