कसोटी सामन्यानंतर लगेचच भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका! दक्षिण आफ्रिकेच्या संघात होणार अनेक खेळाडूंचे पुनरागमन

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून गुवाहाटीमध्ये सुरूवात होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या १-० ने आघाडीवर आहे. तर ३० नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय सामनांची मालिका खेळवली जाणार आहे. या एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.


एकदिवसीय मालिकेत वेगवान गोलंदाज म्हणून ओळख असलेला कागिसो रबाडा खेळणार नाही. कारण कसोटी मालिकेपूर्वी सराव करताना रबाडाला दुखापत झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर यष्टीरक्षक क्विंटन डिकॉकचे दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये डिकॉकने उत्कृष्ट कामगिरी केली होती.


पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या लुहान डि प्रिटोरियसला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. तर एडन मार्करमचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. डोनोवन फरेराऐवजी मार्करम संघाचे नेतृत् करणार आहे. तर पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न खेळलेला केशव महाराज भारताविरुद्ध वनडे खेळणार आहे. मागच्या वर्षी भारताविरुद्ध टी-20 विश्वचषकचा अंतिम सामना खेळल्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाचे सुद्धा टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.




दक्षिण आफ्रिकेची एकदिवसीय मालिकेसाठी खेळाडू


टेम्बा बऊमा (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डिकॉक, टोनी डि जॉर्जी, रुबिन हरमन, मार्को यानसन, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, रियान रिकलटन, प्रेनेलन सुब्रायन




दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ


एडन मार्करम (कर्णधार), ओटिनिल बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डिकॉक, टोनी डी जॉर्जी, डोनोवन फरेरा, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को यानसन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, ट्रिस्टन स्टब्स

Comments
Add Comment

तिरुवनंतपुरममध्ये आज भारत-न्यूझीलंड मालिकेचा समाराेप

होम ग्राऊंडवर संजूसाठी शेवटची संधी? इशानच्या एन्ट्रीने वाढला दबाव तिरुवनंतपुरम : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील

रंगणार थरार वर्ल्डकपचा! भारत पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या वर्ल्ड कप कधी? कुठे? पाहता येणार ....

मुंबई : विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षा कमाल स्तरावर पोहोचतात. आता हीच उत्सुकता

ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात ‘जनरेशन वॉर’

जोकोविच विरुद्ध अल्काराझ यांच्यात लढत मेलबर्न : मेलबर्न पार्कच्या रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या दोन थरारक

ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेन्काने गाठली अंतिम फेरी

मेलबर्न  :जागतिक क्रमवारीत नंबर १ टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

संजू सॅमसनऐवजी इशानला संधी?

टी-२० वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारताची तगडी सेना मुंबई  : येत्या ७ फेब्रुवारीपासून मायदेशात सुरू होणाऱ्या टी-२०