Saturday, November 22, 2025

हार्बरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बेलापूर-पनवेलदरम्यान १२ तासांचा ब्लॉक

हार्बरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बेलापूर-पनवेलदरम्यान १२ तासांचा ब्लॉक

बेलापूर : हार्बर मार्गावरील पनवेल येथे विविध अभियांत्रिकी कामं करायची असल्यामुळे बेलापूर ते पनवेल दरम्यान बारा तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे बेलापूर ते पनवेल दरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध नसेल. पनवेलकडे जाणाऱ्या लोकल बेलापूर, नेरळ, वाशी तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल नेरुळ, वाशी येथे रद्द केल्या जातील.

पनवेल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म दोन वर पायाभूत कामांसाठी बेलापूर ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्री ११.४५ पासून रविवारी सकाळी ११.४५ पर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे रविवारी सकाळी ५.१८, ७.२६, ०८.५४ , १०.१० आणि ११.२६ वाजताच्या सीएसएमटी-पनवेल लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी ८.२०, ८.५८, ११.३० वाजताच्या सीएसएमटी-वडाळा लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत.

  1. शनिवारी रात्री १०.५०ची सीएसएमटी-पनवेल लोकल बेलापूरपर्यंत
  2. शनिवारी रात्री १०.५५ची ठाणे-पनवेल लोकल रद्द
  3. रविवारी सकाळी ९.२८, ११.२८ची पनवेल-सीएसएमटी लोकल वाशी येथून सुटेल
  4. रविवारी सकाळी ११.५२ची पनवेल-सीएसएमटी लोकल बेलापूर येथून सुटेल
  5. रविवारी सकाळी ८.४१, १०.०१ ची ठाणे-पनवेल लोकल, सकाळी ९.०४, ११.४२ ची ठाणे-नेरूळ लोकल, सकाळी १०.२०ची ठाणे-वाशी लोकल रद्द
  6. विवारी सकाळी १०.५८ वाजताची वाशी-ठाणे, सकाळी ९.४२ ची नेरुळ-ठाणे, सकाळी ७.४३, ८.०४, ९.०१, १०.४१ आणि ११.०२ पनवेल-ठाणे लोकल रद्द

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी मेगाब्लॉक

ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक आहे. या ब्लॉकच्या काळात ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकात थांबतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >