नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक

नंदुरबार : नवापूर नगरपालिकेतच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नगराध्यक्षांसह पूर्ण पॅनल उभे केले आहे. यात अचानकपणे जिल्हा विकास आघाडीने नगराध्यक्षसह पूर्ण पॅनल उभे केले. मात्र नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणारे विश्वास बडोगे या अपक्ष उमेदवाराला गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी अटक केली.


नवापूर पालिकेसाठी राष्ट्रवादीतर्फे जयंत जाधव, भाजपतर्फे अभिलाषा वसावे पाटील तर काँग्रेसतर्फे दिपचंद जयस्वाल यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास बडोगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करत पूर्ण पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले. माजी आमदार शरद गावित यांनी त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिला. शक्तिप्रदर्शन करत जिल्हा विकास आघाडीने प्रचारफेरी काढली. प्रचाराला जोर चढू लागला असताना धक्कादायक घटना घडली. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा विकास आघाडीतर्फे अपक्ष लढणाऱ्या विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली.


गुजसी टॉक अर्थात गुजरात दहशतवाद आणि संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा (G.C.T.O.C.) कायदा २०१५ च्या कलम ३(१)(२) आणि कलम ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर गुजरात पोलिसांच्या गांधीनगर पथकाने विश्वास बडोगे यांना अटक केली आहे. माघार घेतली नाही म्हणून गुजरात पोलिसांकरवी विश्वास बडोगे यांना अटक करण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. दरम्यान बडोगेंना सुडबुद्धीनने अटक केली आहे. कॅप्टन आऊट झाला तरी कोच अजून रिंगणात आहे, त्यामुळे कोणीही निश्चिंत राहू नये असे माजी आमदार शरद गावित म्हणाले.

Comments
Add Comment

बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिकाची मुंबईत दिवसाढवळ्या हत्या

मुंबई : विक्रोळी पार्कसाइट परिसरात राहणारे शिउबाठाचे पदाधिकारी सुरेंद्र पाचाडकर यांची घाटकोपर रेल्वे

मुंबईत राडा, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे मुंबईत राडा झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ६६ किमी परिक्रमा मार्गाला ‘हिरवा कंदील’

भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता सात हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी

अल्पवयीन मुले इसिसच्या रडारवर, ‘ऑपरेशन सिंदूर’चा नकाशा पाठविण्याचा आरोप

रायपूर (वृत्तसंस्था): छत्तीसगडमधील दहशतवादविरोधी पथकाने रायपूर आणि भिलाई येथून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात