पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या फर्मशी संबंधित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी यांचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला आहे. पोलिसांनी मंगळवारी तेजवानी यांचा प्रथम जबाब नोंदवला होता. तर दुसरी चौकशी काल (२० नोव्हेंबर) करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करून पवारांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपीला ज्या २७२ मूळ वतनदारांची जमीन विकण्यात आली होती, त्यासाठी तेजवानी यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली होती.
काल झालेल्या चौकशीमध्ये तेजवानी आयुक्त कार्यालयात चार तासांहून अधिक काळ उपस्थित होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, तेजवानी यांनी दिलेली माहिती, सादर केलेली कागदपत्रे किंवा संबंधित सरकारी विभाग आणि कार्यालयाकडून आम्हाला जे काही मिळाले आहे त्याची पडताळणी सुरू असल्यामुळे चौकशीबाबत नोंदवलेल्या जबाबातील कोणताच मजकूर उघड करणार नसल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर ...





