Personal Finance: पोस्टात का बँकेत मुदतठेवीत गुंतवाल? जाणून घ्या सविस्तर ताज्या व्याजदरांसगट एका क्लिकवर !

मोहित सोमण: शेअर बाजारातील व इतर इक्विटी गुंतवणूकीतील तुलनेत गुंतवणूकदारांना सुरक्षित व पारंपरिक गुंतवणूकही हवी असते. अशा वेळी विना जोखीम, अत्यंत सुरक्षित अशी गुंतवणूक म्हणून मुदत ठेव (Fixed Deposit) समजले जाते. मग अशा वेळी सहाजिकच कुठल्या बँकेत अधिक परतावा मिळेल हा मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांना पडतो. मुदत ठेवीचे दर विविध गरजा, विविध ठेवीचा काळ, बँकेचे प्रकार, ठेवलेली रक्कम अशा विविध उदिष्टावर आधारलेले असतात. मात्र आपल्या गरजेनुसार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करणे आवश्यक असते. साधारणतः छोट्या व मध्यम आकाराच्या स्मॉल फायनान्स बँक अधिक परतावा देतात त्यानंतर पीएसयु व इतर खाजगी बँकांचा या यादीत समावेश होतो.


जेष्ठ नागरिकांसाठी विशेष दर - ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकचा विशेष दर व्याजदरात दिला जातो. इतर सामान्य व्याजदरापेक्षा अधिक ०.५०% दर ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांना मिळतो.


मुदत ठेवीचे विविध प्रकार -


मुदत ठेवीचेही विविध प्रकार असतात. जाणून घेऊयात


१) सर्वसामान्य मुदत ठेव (Standard Fixed Deposit) - या प्रकारच्या मुदतेठेवीत भारतीय नागरिक, हिंदु अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family), भागीदार (Partnership),अथवा मर्यादित कंपनी इत्यादी प्रकारच्या संस्था या सर्वसामान्य मुदत ठेवीत आपली रक्कम गुंतवू शकतात. साध्या बचत खाण्यापेक्षा या खात्यात व्याजदर अधिक मिळतो परंतु विशिष्ट कालावधी पूर्वी या खात्यातून पैसे काढता येत नाही काढल्यास मात्र व्याजदरात कपात होते.


२) Saving Account - ज्याला आपण सर्वसामान्य सर्वसाधारण बचत खाते म्हणतो किंवा टॅक्स बचत खाते (Tax Saving) बचत खाते म्हणतो या खात्यात मिळणारा व्याजदर हा मुदतठेवी पेक्षा निश्चित कमी मिळतो मात्र यातील पैसे रक्कम जमा व काढण्यासाठी तुलनेने सवलत असते. मात्र मर्यादेपेक्षा अथवा दैनंदिन व्यवहार (Deposit व Withdrawal) या खात्यातून करता येत नाही.


३) Tax Saving Fixed Deposit: हे फक्त निवासी व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांद्वारे उघडता येते. हे ठेवीदारांना कलम 80C अंतर्गत मूळ घटकावर १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करण्याची परवानगी देते. याचा लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे. त्यापूर्वी पैसे काढता येत नाहीत.


४) Floating Rate Fixed Deposit- फ्लोटिंग रेट मुदत ठेवीत व्याजदर निश्चित नसतो. आरबीआयच्या बदलत्या घडामोडीवर हा दर अवलंबून असतो. बदलणारा रेपो दर, सीआरआर, ट्रेड बील डिस्काउंट यावर तो आधारित असतो. त्यामुळे निश्चित व्याजदर गुंतवणूकदारांना या मुदत ठेवीत मिळत नाही.


५) Corporate Fixed Deposit- या मुदत ठेवी सामान्यतः व्यवसायिक बँका देत नसून त्या एनबीएफसी (विना बँकिंग वित्तीय संस्था Non Banking Financial Institution NBFCs) करतात अथवा हाऊसिंग फायनान्स बँक (Housing Finance Bank HFCs) ऑफर करतात.


६) Flexi Fixed Deposit - फ्लेक्सी एफडी ही मुदतठेव त्यांच्या इतर दुसऱ्या बचत अथवा चालू खात्याशी जोडले जाते. त्यामुळे कधी बचत व चालू खात्यात वित्तीय तूट (Deficit) निर्माण झाली तर या मुदत ठेवी तील फायदा दुसऱ्या खात्यात परावर्तित केला जातो. व राहिलेल्या रकमेवर व्याज दर लागू होतो. त्यामुळे सर्वसामान्य मुदत ठेवी खात्यापेक्षा या खात्यात अधिक मोकळीक (Flexibility) व तरलता (Liqudity) मिळते.


७) Cumulative Fixed Deposit - या क्यूमिलेटिव मुदतठेवीत एफडीमध्ये मूळ रकमेत जोडलेले व्याज उत्पन्न जोडून चक्रवाढ व्याजाचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीपेक्षा अधिक व्याज या प्रकारात खातेदारांना मिळते.


८) Non Cumulative Fixed Deposit- नॉन-संचयी एफडीमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर मिळणारे व्याज नियमित अंतराने, म्हणजे मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिकपणे देणे लागू असते. कॉल करण्यायोग्य एफडी ठेवीदारांना त्यांची मुदत ठेव परिपक्वता येण्यापूर्वी काढण्याची परवानगी देते. तथापि या प्रकारच्या एफडी बंद करण्यापूर्वी ठेवीदारांना दंड भरावा लागू शकतो.


नॉन-कॉल करण्यायोग्य एफडी ही कॉल करण्यायोग्य मुदत ठेवींच्या विरुद्ध असते म्हणजेच ठेवीदार त्यांची गुंतवणूक केवळ परिपक्वतेवरच काढू शकतात. तसेच, नॉन-कॉल करण्यायोग्य एफडीवर दिले जाणारे व्याजदर सहसा कॉल करण्यायोग्य एफडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरांपेक्षा जास्त असतात.


अशातच आर्थिक वर्ष २०२५ मधले ताजे व्याजदर काय सुरु आहेत एकदा नजर टाकूयात -


टेबल दर (सप्टेंबर २०२५ पर्यंत)


१) ॲक्सिस बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.६०% एक वर्षासाठी - ६.२५%, तीन वर्षासाठी - ६.६०%, पाच वर्षासाठी - ६.६०%


२) सीएसबी बँक - सर्वाधिक स्लॅब - ७.००%, एक वर्षासाठी - ५.००%, तीन वर्षासाठी ५.७५%,पाच वर्षासाठी - ५.७५%


३) सिटी युनियन बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.७५%,एक वर्षासाठी - ६.७५%, तीन वर्षासाठी - ६.६५%, पाण वर्षासाठी - ६.२५%


४) डीबीएस बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.५५%, एक वर्षासाठी - ६.३०%,तीन वर्षासाठी- ६.४०%, पाच वर्षासाठी - ६.२५%


५) धनलक्ष्मी बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.८०%, एक वर्षासाठी - ६.२५%, ३ वर्षासाठी - ६.५०%, पाच वर्षांसाठी - ६.५०%


६) आयसीआयसीआय बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.६०%, एट वर्षासाठी - ६.२५%, तीन वर्षासाठी - ६.६०%, पाच वर्षासाठी - ६.६०%


७) एचडीएफसी बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.६०%, एक वर्षासाठी - ६.२५%, तीन वर्षांसाठी - ६.४५%, पाच वर्षासाठी - ६.४०%


८) जम्मू आणि काश्मीर बँक - सर्वाधिक स्लॅब - ७.०५%, एक वर्षासाठी - ६.५५%, तीन वर्षासाठी - ६.६५%, पाच वर्षासाठी - ६.६०%


९) करुर वैश्य बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.८०%, एक वर्षासाठी - ६.५०%, तीन वर्षासाठी - ६.५५%, पाच वर्षासाठी - ६.५५%


१०) कर्नाटक बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.६५%, एक वर्षासाठी - ६.५०%, तीन वर्षासाठी - ६.१५%, पाच वर्षासाठी - ६.१५%


११) कोटक महिंद्रा बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.६०%, एक वर्षासाठी - ६.२५%, तीन वर्षासाठी - ६.४०%, पाच वर्षासाठी - ६.२५%


१२) साऊथ इंडियन बँक - सर्वाधिक स्लॅब - ६.६०%, एक वर्षासाठी - ६.६०%, तीन वर्षासाठी - ६.२०%, पाच वर्षासाठी - ५.७०%


१३)येस बँक - सर्वाधिक स्लॅब - ७.००%, एक वर्षासाठी - ६.६५%, तीन वर्षासाठी - ७.००%, पाच वर्षासाठी - ६.७५%


आता पाहूयात ताजे पोस्टातील दर -


१ वर्ष - ६.९०%


२ वर्ष - ७.००%


३ वर्ष - ७.१०%


५ वर्ष - ७.५०%


आता प्रश्न पडला असेल एफडीत पैसे टाकू का पोस्ट ऑफिसमध्ये तर दोन्ही गुंतवणूकीतील फरक जाणून घेऊयात -


१) तुमची गरज - नक्की गुंतवणूकदारांचे उद्दिष्ट काय किती परतावा हवाय त्या त्या कालावधीत पोस्टमध्ये व मुदतठेवीतील (FD) दर पाहूनच गुंतवणूक करावी.


२) व्याजदर- साधारणतः छोट्या स्मॉल व मध्यम फायनान्स बँकेत परतावा (व्याजदर) अधिक मिळतो त्यामानाने मोठ्या पीएसयु बँक व मोठ्या खाजगी बँकेत व्याजदर कमी मिळते पण ते अधिक सुरक्षित मानले जाते.


३) संरक्षण- डीआयसीजीसी (Deposits Insurance and Credit Guarantee Corporation) संस्थेच्या तरतूदीनुसार, ५ लाखांपर्यंत मुदत ठेवी ही सुरक्षित असते म्हणजेच बँक बुडली तरी ५ लाखांपर्यंत रक्कम खातेदाराला परत मिळते. पोस्ट ऑफिसमधील सगळीच रक्कम परतावा म्हणून सरकारकडून संरक्षित असते.


४) लवचिकता - पोस्ट ऑफिस मधील मुदत ठेवीत कमी लवचिकता मिळते तर बँकेच्या गुंतवणूकीत अधिक लवचिकता मिळते. ७ ते १० दिवसांपासून ५ वर्षांपर्यंत खातेदारांना ठेवी ठेवता येतात तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसमध्ये अगदी छोट्या कालावधीसाठी रक्कम ठेवण्याची तरतूद नाही त्यामध्ये किमान १ वर्षांची गुंतवणूक करणे आवश्यक असते.


५) कर सवलत - ५ वर्षाच्या बँकेतील ठेव ही आयकर कायदा ८० सी नुसार कपातीस (Deductions) साठी पात्र असते तर पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेली मुदतठेवही कपातीसाठी पात्र ठरते.


६) ज्येष्ठ नागरिक- ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजदर अधिक ऑफर करते तर पोस्ट ऑफिसमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी व्याजदर मुदत ठेवीवर मिळतो.


जर तुम्हाला अतिशय जास्त सुरक्षित गुंतवणूकीला प्राधान्य देत असाल तर पोस्ट ऑफिस हा अधिक चांगला पर्याय ठरेल मात्र लवचिकता, अधिक व्याजदरासाठी इच्छुक असाल अथवा ज्येष्ठ नागरिक ठेवीदार असाल तर बँक अधिक चांगला पर्याय ठरेल.

Comments
Add Comment

Bangladesh Earthquake : क्रिकेट सामन्यावर भूकंपाचा ब्रेक! ६ ठार, २०० जखमी, बांगलादेशात ५.७ रिश्टर स्केल भूकंपाचा कहर; १० मजली इमारत एका बाजूला झुकली

ढाका : बांगलादेशमध्ये आज, २१ नोव्हेंबर रोजी, सकाळी १० वाजून ८ मिनिटांनी ५.७ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला. या

अदानी समुह अदानी विल्मर लिमिटेडमधून संपूर्णपणे 'Exit' ब्लॉक डील मार्फत आपली ७% हिस्सेदारी विकली

मोहित सोमण: एक्सचेंज फायलिंगमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, अदानी विल्मर लिमिटेडमधील उर्वरित ७% हिस्साही (Stake)

Groww शेअर 'सुसाट' वेगाने तिमाही निकाल जाहीर होताच ७% उसळला दोन दिवसांची रिकव्हरी एकाच दिवसात!

मोहित सोमण:  ग्रो (Billionbrains Garage Ventures LLC Limited) कंपनीचा शेअर तिमाही निकालानंतर सुसाट वेगाने उसळला आहे. आज दुसऱ्या तिमाहीचा

शिवकुमार यांचे 'ते' विधान आणि कर्नाटकच्या काँग्रेस नेत्यांची खर्गेंसोबत अचानक भेट! कर्नाटकातील राजकारणात बदल घडणार?

नवी दिल्ली: कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

नवी यूपीआयची दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये मेट्रो प्रवाशांसाठी ओएनडीसी नेटवर्कशी हातमिळवणी

भारत: नवी यूपीआयने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) नेटवर्कशी नुकतीच हातमिळवणी केली आहे. आधीच्या तुलनेत मेट्रो