मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी दोहामध्ये रंगणार आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुसरा सेमी फायनल खेळवला जाणार आहे. प्रेक्षकांना हे सामने कुठे पाहायला मिळणार चला जाणून घेऊया ?
भारत आणि बांगलादेशचा सामना दोहातील वेस्ट पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पंच दुपारी १.३० वाजता मैदानाची पाहणी करतील. दुपारी २.३०वाजता टॉस पार पडेल. सामना दुपारी ३.००वाजता सुरू होईल. तसेच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याचा टॉस संध्याकाळी ६.३०ला आणि सामना ७.०० वाजता होईल.
महत्त्वाचे म्हणजे, यावेळी भारताचा सेमी फायनल हॉटस्टार किंवा जिओवर उपलब्ध नसून, प्रेक्षकांना हा सामना सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येणार आहे. Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील दोन्ही सेमी फायनल्सचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.भारत आणि बांगलादेशपैकी विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाची मोहीम इथेच संपणार आहे.