ऐतिहासिक! भारत आणि इस्त्राईलमध्ये मुक्त व्यापार करार, सर्व्हीस सेक्टरला होणार फायदा

तेल अवीवः तेल अवीवमध्ये भारत आणि इस्राईलचा संबंध घट्ट करणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तीना व्यापार शिखर परिषदेमध्ये अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या सीमेवरील राष्ट्रांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे दोन्ही देशांना अतिरेक्यांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर दोनही देशांमध्ये होत असलेला मुक्त व्यापार करार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.


मुक्त व्यापार करारावर भारताकडून केंद्रीय मंत्री गोयल तर इस्रायलकडून केंद्रीय वाणिज्यमंत्री नीर बरकत यांनी काल (२० नोव्हेंबर) रात्री स्वाक्षऱ्या केल्या. भारताकडून 'चीफ निगोशिएटर' म्हणून प्रिया नायर यांनी काम पाहिले. या कराराला दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती मंत्री गोयल यांनी दिली आहे. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांचे विश्वासू सहकारी असून दोघांमध्ये अंतर्विरोध नाही याचा फायदा दोन देशातील व्यवहारांना आणि सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक देवाण-घेवाणीसाठी होईल, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.


या व्यापार करारामुळे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, डिफेन्स, स्पेस, फिनटेक, अॅग्री टेक, ए आय, सायबर सिक्युरिटी याबाबतीत दोन देशांची देवाण-घेवाण होईल. भारतातून आंबे, द्राक्ष, केळी, दूध, औषधे पाठवण्याची प्रक्रीया फास्ट ट्रॅकवर केली जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात फायदा होईल. पहिल्या टप्प्यात दिल्ली तेल अवीव आणि दुसऱ्या टप्प्यात मुंबई ते तेल अवीव थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे भारतातून डॉक्टर, नर्सेस, इंजिनिअर असे कुशल मनुष्यबळ देण्यासाठी दोन देशांमध्ये पूल निर्माण होणार आहे. याचा फायदा सर्व्हीस सेक्टरला होईल. तसेच दोनही देशांमध्ये पर्यटनाला गती मिळणार आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील