दिल्ली बॉम्बस्फोट अपडेट: दहशतवादी डॉ. मुझम्मिलकडे मिळाले बॉम्ब बनवण्याचे व्हिडीओ! व्हिडीओ पाठवणारा परदेशी हँडलर

नवी दिल्ली : लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत एक नवीन खुलासा झाला आहे. फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉ. मुझम्मिलला परदेशातून बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ मिळाले होते. एका परदेशी हँडलरने एन्क्रिप्टेड अॅपद्वारे दहशतवादी डॉ. मुझम्मिल अहमद गनईला ४२ बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ पाठवले होते.


दिल्ली बॉम्बस्फोटात तीन परदेशी हँडलर्सची नावे समोर आल्याचे तपास यंत्रणेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. या तीन हँडलर्सची नाव 'हंजुल्लाह','निसार' आणि 'उकासा' अशी झाली आहे. मात्र सुत्रांचे म्हणणे आहे की, ही परदेशी हँडलर्सची खरी ओळख नसून कोड नावे किंवा टोपणनाव असू शकतात. यातील हंजुल्लाहने बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ दहशतवादी डॉ. मुझम्मिलला पाठवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक केलेला मुझम्मिल हा एकमेव डॉक्टर आहे ज्याला एका परदेशी हँडलरकडून तब्बल ४२ व्हिडिओ मिळाले होते. या व्हिडीओमध्ये बॉम्ब कसा बनवायचा याचे प्रशिक्षण दिले आहे. याबाबत सुरक्षा यंत्रणा आता हँडलरचा अधिक तपास करत असून डॉ. मुझम्मिल सध्या एनआयएच्या ताब्यात आहे.





अलिकडेच, सूत्रांनी सांगितले की अल-फलाह विद्यापीठाची इमारत क्रमांक १७ हे दहशतवाद्यांच्या भेटीचे स्थळ होते. बॉम्बस्फोटाबद्दल कट रचण्याचे काम याच इमारतीमधील खोल्यांमध्ये करण्यात आला होता. तर याच इमारतीमधील खोली क्रमांक १३ मध्ये डॉ. मुझम्मिल राहत होता. त्याच्या खोलीत इतर दहशतवादी डॉक्टरांसोबत गुप्त बैठका होत होत्या. तर याच इमारतीमधील खोली क्रमांक ४ मध्ये डॉ. उमर आणि त्याचे सहकारी भेटत होते. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत बनवलेली रसायने मुझम्मिलच्या खोलीत हलवण्याचा निर्णय या बैठकांमध्ये घेण्यात आला होता. यासाठी मुझम्मिलने प्रयोगशाळेपासून काही मिनिटांच्या अंतरावर लपण्याचे ठिकाण ठरवले होते. याच ठिकाणी पोलिसांकडून स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली होती.



Comments
Add Comment

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच शरद पवारांकडून गोविंद मोकाटेंना उमेदवारी

मुंबई: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

Iran-US-Israel War : अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे (Iran-US-Israel War) इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार