राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रव्यापी लाक्षणिक बंद पुकारतील असा निर्णय पुण्यात मार्केट यार्ड येथील ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’च्या व्यापार भवन सभागृहात पार पडलेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेत घेण्यात आला आहे. या परिषदेत राज्यभरातील विविध व्यापारी संघटनांचे मुंबई, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर , बारामती, लातूर, सोलापूर, पंढरपूर आदी भागांतील १२० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. परिषदेत सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील कालबाह्य ठरलेले कायदे आणि राष्ट्रीय बाजार समितीवरील प्रस्तावित धोरणातील त्रुटी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये व्यापाऱ्यांवर होत असलेल्या सततच्या तपासण्या व दंडात्मक कारवाईला 'अनावश्यक दडपशाही' संबोधत सर्व प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला आहे.


परिषदेचे अध्यक्षस्थान फेडरेशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी भूषविले. यावेळी दिलीप गुप्ता, मोहन गुरनानी, भीमजी भानुशाली, राजेंद्र बाठिया यांच्यासह सुरेश चिक्कळी, संजय शेठे, सूर्यकांत पाठक आणि प्रवीण चोरबेले यांनी व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. या परिषदेचे आयोजन ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मुंबई)’, ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)’, ‘चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड’, ‘ग्रेन, राईस, ऑइल सीड मर्चंट्स असोसिएशन (मुंबई)’, आणि ‘दि पूना मर्चंट्स चेंबर’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.



परिषदेतील प्रमुख ठराव आणि मागण्या:


१. खाद्यान्न आणि अन्नधान्यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रद्द करावा.
२. २६ ऑगस्ट २०२४ रोजी उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीतील प्रलंबित मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावेत.
३. राष्ट्रीय बाजार समिती संदर्भातील प्रस्तावित अध्यादेशातील त्रुटी दूर करण्यासाठी कृती समितीसोबत चर्चा करावी.
४. बाजार समिती कायद्यातील बदलांसाठी कृती समितीच्या मागील सूचनांचा शासनाने विचार करावा.
५. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात.
६. बाजार समिती परवाने तातडीने ऑनलाइन करण्यात यावेत; अन्यथा व्यापारी नूतनीकरण करणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Comments
Add Comment

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक

Leopard Conflict : 'गोळी' की 'नसबंदी'? बिबट्याला पकडण्यासाठी सरकारचा मास्टरस्ट्रोक! तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च करणार अन्...

जुन्नर : पुणे जिल्ह्याच्या जुन्नर (Junner) आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या (Leopard) संख्येत सातत्याने वाढ होत आहे,

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.