फिजिक्सवाला गुंतवणूकदारांना बाजारात धोका एका दिवसात १०००० कोटी बाजार भांडवल खल्लास! दोन दिवसांत २३% शेअर कोसळला

मोहित सोमण: फिजिक्सवाला शेअरमध्ये दोन दिवसात २३% घसरण झाली आहे. काल शेअर ८% आज १५% कोसळला आहे. प्रामुख्याने कंपनीच्या भविष्यातील संभाव्य धोक्यांवर विश्लेषकांनी भाष्य केल्याने, गुंतवणूकदारांनी नकारात्मक कौल दिल्याने, व कंपनीच्या आयपीओत अवास्तव पद्धतीने किंमत वाढवत ती काही घटकांकडून कोसळवली गेली असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे तीन सत्रातच कंपनीचे बाजार भांडवल १०००० कोटी रुपयांनी कोसळले आहे. परवा कंपनीचे आयपीओतील शेअर ३३% प्रिमियम दरासह बाजारात सूचीबद्ध (Listed) झाले होते. त्यानंतर एक दिवस कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने ४४% पर्यंत मूळ प्राईज बँडपेक्षा शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली होती. मात्र कालपासून पुन्हा एकदा शेअरमध्ये घसरण सुरू झाली आहे.


प्रामुख्याने कंपनीच्या समोर असलेली भविष्यातील आव्हाने, संमिश्र फंडामेंटल मधील वाढ, भविष्यातील धोके अशा विविध कारणांमुळे विश्लेषकांनी आयपीओत 'हाईप' तयार करण्यात आली असे स्पष्ट केल्याने बाजारात शेअरला मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते आता ३५२८९ कोटींच्या आसपास पोहोचले आहे. असे असले तरी मूळ किमतीपेक्षा शेअर अद्यापही ३०% प्रिमियम दराच्या आसपास व्यवहार करत आहे.


यापूर्वी विश्लेषकांनी आयपीओत वाटप (Allotment) केले गेलेल्या गुंतवणूकदारांना आंशिक नफा बुक करण्याचा आणि उर्वरित शेअर्स मध्यम मुदतीच्या वाढीसाठी धारण करण्याचा सल्ला दिला होता आणि प्रति शेअर १३० रुपये स्टॉप लॉस दिला गेला होता. दुपारी १.०९ वाजेपर्यंत फिजिक्सवाला शेअर १३.६९% कोसळत १२३.६६ रूपयांवर व्यवहार करत आहे.


उपलब्ध माहितीनुसार कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या महसुलात ५१% वाढ होऊन ३०३९ कोटी रुपये आणि निव्वळ नफा २४३ कोटी रुपये प्राप्त केला असून आर्थिक वर्ष २४ मध्ये ११३१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ईबीटा (EBITDA) मार्जिन ६.७% पर्यंत पोहोचले होते. तरीही संचयी तोटा कायम असून कंपनीने आणखी आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत १२७ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता.


या पब्लिक इश्यूमध्ये ३१००.७१ कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि ३८० कोटी रूपयांचे शेअर ओएफएस (Offer for Sale OFS) विक्रीसाठी उपलब्ध होते. आयपीओत एकूण १.९२ पट सबस्क्राइब मिळाले होते. ज्यामध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांकडून २.८६ पट मागणी वाढली तर किरकोळ गुंतवणूकदारांनी १.१४ पट सबस्क्राइब केले, तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII) सहभाग ०.५१ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ३.७१ पटीने मजबूत सबस्क्रिप्शन मिळाले होते.


अलख पांडे आणि प्रतीक बूब यांनी स्थापन केलेले फिजिक्सवाला कंपनीचे जून २०२५ पर्यंत १.३७ कोटी सबस्क्राइबर्स होते तर आकडेवारीनुसार ४.४६ कोटी पेड युजर व ३०३ अभ्यास केंद्रांसह YouTube चॅनेल सबस्क्राईबरमध्येही भर पडली होती.

Comments
Add Comment

आकडेवारीच समोर - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भारतातील गुंतवणूकीत १४ महिन्यातील नवा उच्चांक प्रस्थापित

प्रतिनिधी: भारतीय शेअर बाजारात टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या मोठ्या प्रमाणात तेजी दिसत आहे. युएस बाजारात

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा पुन्हा चर्चेत; व्हायरल फोटोंनी वाढवल्या अफवा

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री महिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

अनिल अंबानी यांच्या आणखी १४०० कोटींची मालमत्ता जप्त ईडीकरून आणखी एक धक्कादायक कारवाई

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांची आणखी १५०० कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचनालय (Enforcement ED) संस्थेने जप्त केली आहे.